Tarun Bharat

‘संस्कार शिदोरी’ कथासंग्रहाचे आज प्रकाशन

Advertisements

प्रतिनिधी/ मडगाव

गोमंतकीय लेखिका सौ. पुष्पा प्रमोद गायतोंडे यांच्या ‘संस्कार शिदोरी’ या सुबोध बालकथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज रविवार दि. 27 रोजी संध्याकाळी 4 वा. होणार आहे. हा कार्यक्रम गायतोंडे वाचनालय (सेंट जोसेफ हायस्कूलजवळ) आकें-मडगाव येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसंकर असतील तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसाद सावंत (गोवा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) विजेते हजर राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून उल्हास गायतोंडे (निवृत्त अतिरिक्त मुख्य अभियंता जलसंचालनालय, गोवा सरकार) हे हजर राहतील.

या पूर्वी पुष्पा गायतोंडेची आठ पुस्तके कवितासंग्रह, ललित निबंध, चारोळी सग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्या वर्तमानपत्रातूनही लेखन करतात. आज होणाऱया पुस्तक प्रकाशनाला साहित्य रसिक व साहित्य प्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाशक प्रमोद गायतोंडे यांनी केले आहे.

Related Stories

जेसन रॉय इंग्लंड वनडे संघात

Patil_p

बोपण्णा-शेपोव्हॅलोव्ह पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

कॅनडाचा ऍलीसिमे अंतिम फेरीत

Patil_p

फ्रिट्झ, जोकोविच, सित्सिपस, क्विटोव्हा यांची आगेकूच

Amit Kulkarni

क्रिकेटपटूंच्या मानधनकपातीचा विचार नाही

Patil_p

वेटलिफ्टर प्रदीप सिंग उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p
error: Content is protected !!