Tarun Bharat

संस्कृती फौंडेशनच्या वतीने आहार-मास्कचे वाटप

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

येथील सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतीचा वसा जपणाऱया संस्कृती फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून गुरूवारी वृद्धाश्रम, स्वच्छता कामगार, पोलीस आणि गरीब गरजू लोकांना पुलाव तसेच पाणी व मास्कचे वाटप करण्यात आले. यासाठी फौंडेशनच्या सर्व सभासद वर्गाचे सहकार्य लाभले आहे.

संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक समाजसेवक, सेवाभावी संस्था आपापल्या परिने जनतेला मदतीचा हात देवून सेवा करीत आहेत. याचप्रमाणे संस्कृती फौंडेशन वतीनेही आपला सामाजिक वसा जपला आहे. फौंडेशनचे संस्थापक रणजित उचगांवकर, संजय उचगांवकर, तृप्ती बुत्तेवाडकर, डॉ. राणी बुत्तेवाडकर, श्रद्धा उचगांवकर व पुजा उचगांवकर आदी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

एअर मार्शल आर. डी. माथूर यांची सांबऱयाला भेट

Patil_p

एसएफसी अनुदान मंजुरीसाठी कॅन्टोन्मेंटकडून पाठपुरावा

Amit Kulkarni

पर्यायी रस्त्याविना गैरसोय; स्मार्ट सिटी कामाचा फटका

Amit Kulkarni

शहर परिसरात पाणीटंचाईचे संकट तीव्र

Amit Kulkarni

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी संजीव हम्मण्णावर फ्रान्सला रवाना

Amit Kulkarni

हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेसचा मडगावपर्यंत विस्तार

Amit Kulkarni
error: Content is protected !!