Tarun Bharat

संस्कृत भाषा संवर्धन आवश्यक : सतीश गोरे

Advertisements

प्रतिनिधी / सांगली :

            सांगली येथील पुतळाबेन शाह बीएड. कॉलेज येथे कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूर व संस्कृत भारती, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांसाठी संस्कृत माध्यमातून संस्कृत अध्यापन या विषयानुसार संस्कृत शिक्षण कौशल कार्यशाळेचे उद्घाटन समन्वयक सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह, मा. कार्यवाह सतीश गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित तुपे यांनी केले. उद्घाटनावेळी बोलताना संस्कृत भाषा हे आपले भाषिक सामर्थ्य असून सुजाण नागरिक व आदर्श पिढी घडवण्यासाठी संस्कृत भाषा सर्व स्तरांतून शिकवणे आवश्यक असल्याचे मत सतीश गोरे यांनी मांडले.

            यावेळी उन्मेश आटपाडीकर (सोलापूर) यांचे पहिल्या दिवशी मार्गदर्शन मिळाले. या कार्यशाळेत अदिती माधवन, मुंबई. अतुल प्रभावळकर, कोल्हापूर. सौ. मुक्ता मराठे, पुणे. माधव केळकर, पुणे. शिवराम कुलकर्णी, कोल्हापूर. तसेच कालिदास विदयापीठ प्रतिनिधी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. सूत्रसंचालन सौ. हर्षदा बेडेकर यांनी तर आभार संस्कृत शिक्षक रघुवीर रामदासी यांनी मानले.

Related Stories

मारहाण झालेल्या साधूंचे जबाब घेण्यासाठी उमदी पोलीस उत्तर प्रदेशात

Abhijeet Shinde

सांगली : काळजातला बाप पुस्तक प्रकाशन

Abhijeet Shinde

पद्मश्री सतीश आळेकर यांना भावे पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

शेतकरी संघटनेची सोमवारी ट्रॅक्टर रॅली

Abhijeet Shinde

सांगली शहरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

Abhijeet Shinde

सांगली : पोलीस अधीक्षक `ऍक्शन मोड’मध्ये

Abhijeet Shinde
error: Content is protected !!