Tarun Bharat

संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबे बनली मजबूत

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा 19 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा 19 वा वर्धापन दिन रामदेव गल्ली येथील संस्थेत उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले हे उपस्थित होते. यावेळी चंदगड बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन आणि संघटना सचिव एकनाथ पाटील यांनी व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यांचे स्वागत केले.

यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना रणजीत चौगुले म्हणाले की, चंदगड रहिवासी संघटनेची नाळ आज सर्वसामान्यांशी जोडली गेली असून ती गरजूंचा आधार बनली आहे. कित्येक कुटुंबे या संस्थेच्या माध्यमातून मजबूतदेखील बनली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर चित्रपट निर्माते गणपत पाटील, चंदगड बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन एकनाथ पाटील, उपाध्यक्ष अशोक थोरात, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती सुनील चौगुले उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छापर भाषणात गणपत पाटील यांनी आपला प्रवास सांगत चित्रपट निर्मितीची संकल्पना उलगडली. ‘जीवन संघर्ष फौंडेशन’ च्या माध्यमातून वेगवेगळय़ा सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. प्रास्ताविक प्रा. एम. के. पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर कंग्राळकर यांनी केले. उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी आभार मानले.

यावेळी डी. बी. पाटील, पी. सी. पाटील, मारुती बिर्जे, अशोक पाटील, निंगाप्पा पाटील, मारुती गावडे, सुनील पवार, भागोजी गावडे, सुरेश राजगोळकर, महेश कत्यान्नवर, संजय खवनेवाडकर, आनंद पाटील, उमेश कुलकर्णी, विवेक पाटील, एम. पी. पाटील, छाया पाटील, उमेश शिरगावकर यांच्यासह बहुसंख्य संचालक आणि सभासद उपस्थित होते.

Related Stories

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत साई क्लबच्या खेळाडूंचे यश

Amit Kulkarni

रस्ता खोदला पण वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे

Amit Kulkarni

दसरा-दिवाळीसाठी राज्यात स्वतंत्र मार्गसूची जारी

Omkar B

बॅ.नाथ पै चौकात गटारीचे काम सुरू

Patil_p

पोतदार, एमक्हीएम, ज्ञान प्रबोधन संघ विजयी

Patil_p

येडियुराप्पा रोडवरील भाजीमार्केट बंद झाल्याने समस्या

Patil_p