Tarun Bharat

सकाळी गर्दी तर दुपारी शुकशुकाट

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात कोरोनाची साखळी काही केल्या ब्रेक होत नाही. रुग्ण संख्या शेकडय़ाने वाढत आहेत. प्रत्येक पेठेत एक ना एक बाधित आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकही आता कोरोना कधी संपतोय मोकळीक कधी मिळतेय याच्याच प्रतिक्षेत आहेत. कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कडक लॉकडाऊन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळस्तरावर होत असलेल्या बैठकांमुळे बुधवारी सकाळी सात वाजताच शहरातील रस्त्यावर वर्दळ दिसू लागली. ही गर्दी आणखी कडक लॉकडाऊन असल्याच्या पार्श्वभूमीवर दिसत होती. प्रामुख्याने ही गर्दी सकाळी 11 वाजेपर्यंतच दिसत होती.

कोरोनामुळे सातारकरांचे दिनचक्र बदलु लागलेले आहे. दररोज सायंकाळी प्रशासनाचा वेगळाच नियम परिपत्रक पडत आहे. त्याकडे सगळय़ांच्या नजरा लागलेल्या असतात. त्यात सकाळी दररोज किती जण बाधित झाले नव्याने किती जण मृत्यू झाले. आपल्या आजूबाजूचे कोणी नाही ना याची चौकशी केली जाते. परंतु बुधवारी सकाळी सातारा शहरातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसली तरी कडक लॉकडाऊन लागणार असल्याच्या सततच्या बातम्यामुळे. नागरिकांनी आपल्याजवळ जेवढे पैसे असतील तेवढेच साहित्य खरेदी करुन घेण्यामध्ये बाजारपेठेत सकाळी सात ते 11 एवढीच किराणा मालाची दुकाने उघडी असतात. त्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्स पाळून नागरिक खरेदी करण्यात व्यस्त होते. ही गर्दी सकाळी 11 वाजेपर्यत दिसत होती. दुपारी 11 नंतर शहरातील ही गर्दी पांगू लागली.

विचारपूस करुनच पोलिसांकडून कारवाई

गतवर्षी पोलिसांनी मिळालेल्या आदेशाचा पुरेपुर फायदा उठवत अनेकांच्या पाठीत काठय़ाचे वळ उठवले. त्यामुळे सर्वसामन्यांच्यामध्ये पोलिसांची प्रतिमा काहीशी मलिनही झाली. मात्र, ते पोलिसांनी त्यांच्याच संरक्षणासाठी केल्याचे दिसत होते. यावेळी कोरोना बाधितांचा आकडा जरी वाढत असला तरीही पोलिसांना अजूनही कडक कारवाईचे आदेश नसल्याने सध्या विनाकारण बाहेर फिरणाऱयांची अगोदर चौकशी केली जाते. नंतरच जर चुकीची उत्तरे मिळाली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सातारा पोलीस दल अजूनही वरीष्ठांच्या आदेशाची प्रतिक्षा करत आहेत.

युनियन भाजी मंडईमध्ये कोरोनाचा शिरकाव

राजवाडा परिसरातील युनियन भाजी मंडईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तेथील काही भाजी विक्रेते पॉझिटीव्ह आल्याने मंडईच मायक्रो कंटेटमेंट झोन पालिकेने ठरवला आहे. युनियन भाजी मंडई बंद केल्याने रस्त्यावरच विक्रेते बसत आहेत. सोशल डिस्टन्स ठेंवून सकाळी खरेदी होतना दिसत आहे. मात्र, युनियन मंडईत कोरोनाचा शिरकाव झाल्याने पालिकेने ती जागा सॅनिटायझर करुन मायक्रो कंटेटमेंट झोन केलेली आहे.

Related Stories

मंत्री अब्दूल सत्तारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Patil_p

काही चांगलं पण घडतंय…

datta jadhav

महिलेसह कुटुंबास मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

datta jadhav

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात कोरोना संदर्भात 2.55 लाख गुन्हे

datta jadhav

संभाजीनगरमध्ये 2.22 लाखांचे दागिने चोरीला

datta jadhav

कृषी विभागातर्फे 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत साठा मंजूर

Patil_p