Tarun Bharat

सक्रिय रुग्ण संख्या दीड हजारांच्या उंबरठय़ावर

बुधवारी कोरोनाचे 285 नवे रुग्ण, बेळगाव तालुक्यातील 137 जणांचा समावेश

प्रतिनिधी / बेळगाव

बुधवारी जिह्यातील 285 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येत वाढ सुरूच असून 1384 रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात व घरी उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी बेळगाव तालुक्मयात 137 नवे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी शहर व उपनगरांतील रुग्णांची संख्या अधिक आहे.

बेळगाव शहरातील 127 व तालुक्मयातील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गोकाक तालुक्मयात 28, खानापूर तालुक्मयात 27, अथणी तालुक्मयात 25 व हुक्केरी तालुक्मयात 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 29 हजार 647 वर पोहोचली असून आतापर्यंत 27 हजार 682 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 7 हजार 213 जणांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल यायचा आहे. आतापर्यंत 6 लाख 42 हजार 528 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 लाख 2 हजार 519 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने 400 चा आकडा दाटला होता. बिम्स्मधील 15 विद्यार्थी व कर्मचाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बुधवारी संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  कर्नाटकातील बहुतेक जिह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली असून कोरोनामुक्त झालेल्या बेळगाव जिह्यातील 45 जणांना घरी गेल्या 24 तासांत घरी पाठविण्यात आले आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे.

सांबरा एटीएसमधील आणखी तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काकती, केदनूर, हिंडलगा, पंतनगर, पंतबाळेकुंद्री, शिंदोळी येथे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. टिळकवाडी, वडगाव, अनगोळ, अंजनेयनगर, अशोकनगर, अयोध्यानगर, अजमनगर, बसवणकुडची, भाग्यनगर, बसवाण गल्ली, कॅम्प, राणी चन्नम्मानगर, चव्हाट गल्ली, गोंधळी गल्ली, गुडस्शेड रोड, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पीसीविंग, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, संगमेश्वरनगर, शास्त्राrनगर, शहापूर, हिंदवाडी, विरभदनगर, वंटमुरी, कणबर्गी, जाधवनगर, नेहरुनगर, पार्वतीनगर येथे रुग्ण आढळून आले असून खानापूर तालुक्मयातील पास्टोळी, पारिश्वाड परिसरातही कोरोना रुग्ण आढळले आहेत. अथणी व गोकाक तालुक्मयातही रुग्ण संख्या वाढती आहे.

Related Stories

कर्नाटक: राज्यात एका दिवसात ५५ हजाराहून अधिक जणांची तपासणी

Archana Banage

खानापूर येथील गांधीनगरमध्ये टाऊन कॅफेचा शुभारंभ

Amit Kulkarni

जीआयटी एमबीएमध्ये विद्यार्थी विकास कार्यक्रम

Amit Kulkarni

मांगूर फाटय़ानजीक अपघातात दुचाकीस्वार गंभीर

Patil_p

1 नोव्हेंबर रोजी तालुक्मयात कडकडीत हरताळ

Patil_p

त्वरित रोगनिदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा

Amit Kulkarni