Tarun Bharat

सचिन तेंडुलकर जगातील तिसऱया क्रमांकाचा प्रशंसनीय क्रीडापटू

वृत्तसंस्था/ लंडन

जागतिक क्रीडा क्षेत्रातील प्रशंसनीय क्रीडापटूंच्या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचा फलंदाज सचिन तेंडुलकर तिसऱया स्थानावर आहे. या यादीमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या तर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लायोनेल मेसी दुसऱया स्थानावर आहे.

‘युगोव्ह’ या ब्रिटीश मार्केट रिसर्च व डाटा ऍनेलिटिक्स फर्मच्या सर्व्हेमध्ये जागतिक क्रीडाक्षेत्रातील प्रशंसनीय क्रीडापटूंची निवड करण्यात आली. या यादीमध्ये रोनाल्डो आणि मेस्सी या फुटबॉलपटूंनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळविले असून सचिन तेंडुलकर तिसऱया तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे.

युगोव्हतर्फे राजकीय क्षेत्रामध्ये सर्वात प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या स्थानावर असून बिल गेटस् दुसऱया आणि जिनपिंग तिसऱया स्थानावर आहेत. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आठव्या स्थानावर असून बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान चौदाव्या, अमिताभ बच्चन 15 व्या स्थानावर आहे. जगातील सर्वोत्तम प्रशंसनीय महिला म्हणून ओबामा यांची पत्नी मिचेली ओबामा पहिल्या स्थानावर असून अँजेलिना जाँली दुसऱया आणि क्विन एलिझाबेथ-2 तिसऱया स्थानावर आहेत.

Related Stories

रशीद खानला पीएसएल स्पर्धेत खेळण्यासाठी ससेक्सकडून परवानगी

Patil_p

देवेंद्र, निमिशा यांना सुवर्णपदके

Amit Kulkarni

दोन स्वतंत्र संघ निवडण्याचा अनिल कुंबळेंचा सल्ला

Patil_p

महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा 7 ऑगस्टपासून

Patil_p

लंकन क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई

Patil_p

रोहित-इशांत पहिल्या दोन कसोटीतून बाहेर

Patil_p