Tarun Bharat

सचिन तोडकर, प्रविण लिमकरसह १६ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव

प्रतिनिधी/कोल्हापूर

आगामी गणेशोत्सव उत्साहाने व निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी जुना राजवाडा पोलिसांनी 16 जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे प्रस्ताव करवीर प्रांतांकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत. 10 ते 20 सप्टेंबर कालावधीत या सोळा जणांना शहर व तालुक्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली.

रणजीत पांडूरंग मोरस्कर (2 गुन्हे, रा. रंकाळा टॉवर, कोल्हापूर), विकी उर्फ विक्रम राजेंद्र पोलादे (7 गुन्हे, रा.तस्ते गल्ली, मंगळवार पेठ) प्रविण प्रकाश लिमकर (6 गुन्हे, रा. हरीओमनगर,अंबाई टँक), सचिन दिलीप तोडकर (7 गुन्हे, रा. आझाद चौक , रविवार पेठ) अभिजित माणिकराव कुदळे (3 गुन्हे, रा. टिंबर मार्केट,) स्वप्निल संजय चौगले (2 गुन्हे रा. फिरंगाई तालीम, शिवाजी पेठ), सागर लक्ष्मण कुरडे (7 गुन्हे, रा.वारे वसाहत), सचिन बबरु गायकवाड (9 गुन्हे रा. सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी), प्रताप शशिकांत देसाई (2 गुन्हे रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ), संतोष नारायण मंझाले (4 गुन्हे, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर), रोहित दिपक भाले (3 गुन्हे, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर), प्रकाश विलासराव सावंत (1 गुन्हा, रा.इंगळे बोळ मंगळवार पेठ) प्रदीप दयानंद सरवदे (2 गुन्हे, रा.न्यू कणेरकर नगर), अंकुश नामदेव कोंडारे (5गुन्हे,मैलखड्डा, संभाजीनगर), रोहीत नारायण केसरकर(7 गुन्हे, रा.शिवाजी पेठ,), कपिल राजेंद्र केसरकर (रा. गंजी गल्ली, सोमवार पेठ) या सोळा जणांचा समावेश आहे. या 16 जणांवर विविध गुन्हे दाखल आहेत.

मंडळाच्या पदाधिकाऱयांनाही नोटीस

सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांनाही सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आलेली आहे. कोणत्याही मंडळाच्या कार्यकर्त्यानी आगमन व विसर्जन मिरवणुक काढण्याचा किंवा त्यासाठी वाद्याचा वापर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा आशयाच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.

Related Stories

कोल्हापुरात आणखी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

स्वच्छ सर्व्हेक्षणातर्गंत ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान

Archana Banage

मोळी बांधणी वजावट 1 टक्काच – साखर आयुक्त

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई दर्शन वेळेत बदल

Archana Banage

रेड झोनच्या सीमेवर कोल्हापूर

Archana Banage

महाविद्यालयीन युवतींना रेस्क्यू फॉर्सचे प्रशिक्षण

Archana Banage
error: Content is protected !!