Tarun Bharat

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी

ऑनलाईन टीम / जयपूर : 

राजस्थानात बंडाचे निशाण हाती घेतलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे असणारी इतर खातीही काढून घेण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन यांच्यात मागील काही दिवसांपासून वर्चस्ववाद सुरू होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी स्पष्ट होती. त्यातच पायलट यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. पक्षाला आव्हान देत पक्षविरोधी भूमिका त्यांनी घेतल्या. गेहलोत यांना बाजूला करून पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी तीन वेळा प्रयत्न केला, तो असफल ठरला. 

पायलट यांनी शनिवारी 22 आमदारांसह दिल्ली गाठली होती. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर गेहलोत यांनी सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. आज विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक जयपूर येथील हॉटेल फेअरमोन्टमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा दावा काँग्रेसने केला. या बैठकीत पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली. या बैठकीला पायलट उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पक्षाने त्यांचे बंड मोडीत काढत त्यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी केली.

Related Stories

बायडेनच्या इशाऱ्यानंतर चीनने अमेरिकेला फटकारले

Kalyani Amanagi

विरोधकांची घोषणाबाजी; अन् राज्यपालांनी सभागृह सोडले

Abhijeet Khandekar

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है ; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Archana Banage

‘बुडा’च्या चौकशीसाठी ‘आप’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Sandeep Gawade

कर्नाटकला कोविशिल्ड लसीचे मिळाले ७.५ लाख डोस

Archana Banage

दिलासा : कोरोनामुळे मृ्त्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार भरपाई

Archana Banage