Tarun Bharat

सचिन म्हणतो,हा संघ जिंकेल यंदाची आयपीएल !

क्रिकेट हा मुळातच अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यातही टी-20 मध्ये ही अनिश्चितता आणखी पराकोटीला पोहोचते. पण, तरीही आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकरने यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार कोण असेल, याचा अंदाज वर्तवला आहे आणि तो संघ म्हणजे त्याच्याच लाखमोलाचे मुंबई इंडियन्स!

माजी सलामीवीर आकाश चोप्राने यूटय़ूब चॅनेलसाठी सचिनची मुलाखत घेतली, त्यावेळी सचिनने जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स या आपल्या घरच्या संघाला पसंती दिली. आकाश चोप्राने दिल्ली कॅपिटल्स हा संघ सर्वाधिक समतोल असल्याचे नमूद केले तर त्याला उत्तर देताना सचिनने हा वेगाचा खेळ असल्याचे म्हटले. 53 दिवसांच्या या स्पर्धेत सर्वच संघांना बरेच चढउतार पहायचे आहे, याचाही त्याने उल्लेख केला.

Related Stories

पाक संघातून हाफीज, फक्रला डच्चू

Patil_p

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

दुसऱया दिवसअखेर भारत 6 बाद 229

Patil_p

बार्सिलोनाचा निसटता विजय, मेसीचा 500 वा सामना

Patil_p

भारतीय संघाच्या सरावास प्रारंभ

Patil_p