Tarun Bharat

सचिन वाझे मुख्यमंत्री ठाकरे यांना ‘फसवत’ होता, अँटिलिया प्रकरणात दिली खोटी माहिती

मुंबई/प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. याचसोबत, वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा देखील कट वाझेनेच रचला होता असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच सचिन वाझे अँटिलिया प्रकरणात मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असल्याचे एनआयए ने म्हंटले आहे.

दरम्यान, सचिन वाझे अँटिलिया प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोटी माहिती देत होता. मनसुख हिरेनच्या हत्येनंतरही ती आत्महत्याच आहे असं वाझे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होता, असं एनआयएने आपल्या अहवालात म्हटलं आहे. “मनसुखचा मृत्यू ही आत्महत्याच आहे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून काहीही विशेष बाहेर येणार नाही” असं वाझेने मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होतं, असा दावा एनआयएने केला आहे. शिवाय अँटिलिया स्फोटके प्रकरणात दहशतवादी अँगल नाही पण तपास फक्त मीच करावा अशी मुभा द्या असंही वाझेने मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, असं NIA ने आहे.

Related Stories

हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग; 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

datta jadhav

पंधरा हजारावर चाचण्या; बाधित 595

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला केले संबोधित

Archana Banage

तुर्की, ग्रीस भूकंपाने हादरले; पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती

datta jadhav

किंचित दिलासा! महाराष्ट्रात मागील 24 तासात 68,537 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

राज्यपालांचा मी लाडका मंत्री; मला कुठलीच अडचण येत नाही

Archana Banage