Tarun Bharat

सचिन वाझेंची विशेष एनआयए कोर्टात धाव ; केल्या ‘या’ तीन मागण्या


मुंबई \ ऑनलाईन टीम

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात अटक असलेला आरोपी आणि निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली आहे. कुटुंबीयांना भेटण्याच्या परवानगीसह काही मागण्यांसाठी वाझे यांनी अर्ज केला आहे.

सचिन वाझे यांनी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्याचबरोबर घरच्या सदस्यांना भेटण्याची आणि घरचे जेवण मिळण्याबाबतही परवानगी मागितली. सचिन वाझेंच्या वकिलांनी एनआयए कोर्टात यासंबंधी अर्ज केला आहे.

दरम्यान, एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी वाझेची कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र इतर दोन अर्ज म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचार आणि घरच्या जेवणासंदर्भात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सचिन वाझे यांना तीन हार्ट ब्लॉकेजेस असून बायपास करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Related Stories

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त साकारली पाषाण खडीपासून कलाकृती

Archana Banage

…तर हे पाऊल भारताला चुकीच्या वळणावर नेणार – अमेरिका

Abhijeet Khandekar

पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे

Archana Banage

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला; नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज

Abhijeet Khandekar

धामणगाव : 350 वर्षांत पहिल्यांदाच आषाढी यात्रेला ब्रेक

Archana Banage

Navneet Rana आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : नवनीत राणा

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!