Tarun Bharat

सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपला राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य पातळीवरील पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. त्यांनी सावंत यांना डावलून पक्षाचे मुख्य प्रवक्तेपद तयार करून अतुल लोंढे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. या नाराजीतून सावंत यांनी थेट हायकमांडला पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.

पटोले यांनी प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचा समावेश आहे. सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे तर डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर : सांगरुळतील ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षण : छगन भुजबळांच्या भेटीबाबत फडणवीसांनी केला खुलासा

Abhijeet Shinde

ऍट्रासिटीची भीती दाखवून उकळली आठ लाखांची खंडणी

Patil_p

गांधीनगरसह परिसरातील रुग्णसंख्या पोहोचली १४३ वर

Abhijeet Shinde

33 केंद्रीय मंत्र्यांवर दाखल आहेत गुन्हे

Patil_p

निकृष्ट बियाणे प्रकरणी सखोल चौकशी करून मदत दिली जाणार : कृषीमंत्री

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!