Tarun Bharat

सज्जनगडचा भिक्षावळ दौरा रद्द

शाहूपुरी / वार्ताहर : 

श्री समर्थ नामाचा जयघोष करीत व ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’अशा समर्थराम जयघोषात परळी येथे मानाची कार्तिकी एकादशी भिक्षावळ झाली. दरवर्षी परळी येथे श्री समर्थ सेवामंडळाच्यावतीने या भिक्षावळीचे आयोजन करण्यात येते. सज्जनगडावर कायमस्वरुपी अन्नदान सुरू असते. या अन्नदानासाठी वर्षातून तीन महिने या भिक्षावळ दौऱ्याचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने तीन महिन्यांचा भिक्षावळ दौरा करणार नसल्याची माहिती श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी दिली. 

परळी भिक्षावळसाठी सज्ज होते. प्रत्येकाच्या दारात सडा रांगोळ्यांनी अंगण सजले होते. पेठेतील मारुती मंदिरात झोळी पूजन करून भिक्षेस सुरुवात करण्यात आली. पाद्यपूजा करून भिक्षावळ अर्पण केली जात होती.

Related Stories

अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला साताऱयातून मिळावा

Patil_p

सातारा : आमदार मकरंद पाटील यांच्या गावातील निवडणूक कशी होणार?

datta jadhav

जिल्हा रुग्णालयातील दहा तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सहा अनुमानितांचे रिपोट्र निगेटिव्ह

Archana Banage

सातारा : लुत्सी श्वानाच्या डोहाळजेवणाचे वाईच्या लेकीने केले सोपस्कार

Archana Banage

सातारा : डॉ. ज्ञानेश्वर मोरेंनी मध्यरात्री बोटीत केली महिलेची प्रसूती

datta jadhav

सातारा : गडकर आळीतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

Archana Banage