Tarun Bharat

सततचा पाऊस व वेगवान वाऱ्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान

वार्ताहर / म्हैसाळ

म्हैसाळसह परिसरात गेले आठवडाभर सतत पडणाऱ्या पाऊस व वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून तोडीस जाणारा उभा उस जमीनदोस्त झाला आहे. शिवाय केळी, द्राक्षाच्या बागा ही संकटात सापडलेल्या आहेत. गळीत हंगाम तोंडावर आलेने लवकरच ऊसतोड सुरू होतील या प्रतिक्षेत ‌शेतकरी आहे.

दरम्यान गेले तीन चार दिवसापासून वेगवान वार्यासह मुसळधार पावसामुळे ऊस जमिनदोस्त झाला आहे. शिवाय द्राक्ष बागांची छाटणी केली असून या पावसामुळे बुरशी, दावण्यासारख्या रोगाने ही शेती ही संकटात सापडली आहे. वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे ही नुकसान झाले आहे. एकंदर खात्रीशीर वाटणारी बागायत शेती ही संकटात सापडली आहे. यामुळे शेतकरी ‌वर्ग हवालदिल झाला आहे.

Related Stories

सांगली : कोयनेत ५ टीएमसी पाणी वाढले, आज विसर्ग वाढणार

Archana Banage

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

Archana Banage

आमणापूर बसस्थानकाजवळ अज्ञात शिवप्रेमींनी रात्रीत उभारला छ. शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा

Archana Banage

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला ऑक्‍सिजनचा टॅंकर

Archana Banage

बोरगाव-ताकारी रस्त्यावर अपघात; दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी

Archana Banage

शंभर फुटी रोडवर हातगाडी मालकाचा खून

Archana Banage