प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर – जिल्ह्यात काल रात्री आणि आज बुधवारी झालेल्या पावसामुळे उत्तर सोलापुरातील नंदुर या गावात मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरले आहे. तर काही घरांची पडझड झालेली आहे. ड्रेनेजसाठी खड्डा खोदून ठेवलेला अद्यापही उघडा असल्यामुळे येथील रस्ता बंद आहे. वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी सरपंच तसेच प्रशासनाचे कोणतेही अधिकारी न आल्यामुळे नागरिक वैतागले आहेत.


previous post