Tarun Bharat

सतत पावसामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रातील हॉटमिक्स डांबरीकरण बंद

वाळपई / प्रतिनिधी

पावसाळी मौसमामध्ये वाळपई नगरपालिका क्षेत्रातील हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम या संदर्भात नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सदर काम बंद करण्यात आलेले आहे.

 दरम्यान वाळपई नगरपालिका क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आलेल्या डांबरीणामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरपालिका क्षेत्रातील शिल्लक राहिलेले डांबरीकरण पावसाळय़ानंतर हाती घेण्यात येणार असल्याचे अधिकारीसूत्रांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती अशी की पावसाळी मोसम अवघ्या आठ दिवसांवर आला असताना नगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास तीन कोटी खर्चून डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार 15 मे पर्यंत सर्व प्रकारची कामे करणे पूर्ण करणे गरजेचे असते. यंदा मात्र काही अडचणी निर्माण झाल्याने सदर डांबरीकरण करण्यास बराच उशीर झाला होता .यामुळे संबंधित कॉन्ट्रक्टरने 25 मे दरम्यान कामाला सुरुवात केली होती. यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करून या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी कामाला उशीर झाल्याचे कारणे स्पष्ट केली होती. तरीसुद्धा नागरिकांनी अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. सोशल मीडियावर सदर प्रकाराबाबत  अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. याची दखल घेऊन व गेल्या दहा दिवसांपासून सत्तरी तालुक्मयात वारंवारपणे पाऊस पडत असल्यामुळे सदर काम बंद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. सध्यातरी शिल्लक असलेले डांबरीकरण पावसाळय़ानंतर हाती घेण्यात येणार असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेली आहे.

  दरम्यान वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाणी अनेक स्तरावर रस्ता खराब झाला होता. याची दखल घेऊन या रस्त्याला प्राधान्य दिल्यामुळे सध्यातरी मध्यवर्ती ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेले आहे .यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या डांबरीकणामुळे शहराला वेगळय़ा प्रकारची झालक  प्राप्त होत असून संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात आल्यानंतर चांगल्या प्रकारची सुविधा शहराला निर्माण होणार आहे. प्राप्त माहितीनुसार नगरपालिका क्षेत्रातील तीन कोटी रुपये खर्चून आवश्यक ठिकाणी हाँटमिक्स डांबरीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी करताना सदर प्रकारचे डांबरीकरण हाती घेण्यात आले होते.

Related Stories

आजपासून शारदीय नवरात्रोत्सव

Amit Kulkarni

एकदिवशीय पावसाळी अधिवेशन आज

Omkar B

आयनॉक्स जवळील भाजीपाला विक्रेते आजपासून आपल्या मुळ ठिकाणी

Omkar B

खाण पर्व संपले, ना लीज ना कन्सेशन

Amit Kulkarni

आपने वीज आंदोलनाद्वारे प्रत्येक गोंयंकराच्या हृदयाला स्पर्श केला

Amit Kulkarni

आंदोलन करणाऱया ट्रक मालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Patil_p