Tarun Bharat

सतीश सावंत यांनी जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा!

Advertisements

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांची मागणी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

कणकवली तालुक्यातील कनेडी येथील मोतेस डिसोजा आत्महत्या प्रकरणी त्याचे वडील फिलीप डिसोजा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह अठराजणांवर संशय व्यक्त केला आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेच्या अनुषंगाने मोतेस डिसोजा आत्महत्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

कनेडी येथील मोतेस डिसोजा याने आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर कणकवली पोलिसांनी आठजणांना अटक केली होती. ते जामिनावर मुक्त आहेत. मोतेस डिसोजा याचे वडील फिलिप डिसोजा यांनी मुलाच्या आत्महत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. यात त्यांनी सतीश सावंत तसेच अन्य अठरा यांच्यावर संशय व्यक्त केला होता. न्यायालयाने या आत्महत्या प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश दिले. तसेच यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचनाही केल्या. त्यामुळे सावंत यांनी राजीनामा देणे आवश्यक असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. कणकवली पोलिसांनी या प्रकरणाचा नि:पक्षपातीपणे तपास करून या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे. मृत्यूप्रकरणी मोतेस डिसोजा याच्या वडिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिली आहे. त्यामुळे पोलीस तपासात अडथळा होईल, असे मी बोलणार नाही. पोलिसांनी आपले काम करून न्यायालयात लवकरात लवकर अहवाल सादर करावा, अशी सूचना परब यांनी केली.

Related Stories

जखमीची साक्ष महत्वाचा पुरावा!

Patil_p

किल्ले सिंधुदुर्गला २१ हजार पर्यटकांची भेट

NIKHIL_N

देवगडमधील इंटरनेट सेवा बारा तासाहून अधिककाळ ठप्प

NIKHIL_N

कार अपघातात युवा उद्योजक ठार

NIKHIL_N

दोन दिवसात पाचजणांचा मृत्यू

NIKHIL_N

कोकण मार्गावर रत्नागिरी-दिवा पॅसेंजर तीन तास विलंबाने

Patil_p
error: Content is protected !!