Tarun Bharat

सत्कार हा कलाकारांसाठी प्रेरणादायी : ज्येष्ठ दशावतारी कलाकार श्री. जी. जी. चोडणेकर

मालवण/प्रतिनिधी-

माझा हा दशावतार प्रवास इथवर येऊन पोचण्याच कारण एकच की,एका कलाकाराने निरोप देताना म्हंटले की, गाबतांचे हे काम नव्हे गाबतांनी बांगडे मारावे आणि वाटे घालावे… गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच देखील दणाणून सोडतात असे प्रतिपादन जेष्ठ दशावतारी कलाकार श्री. जी. जी. चोडणेकर यांनी देवबाग येथील कार्यक्रमात मांडले. शुक्रवार दि. २१ जानेवारी रोजी मालवण शिवसेनाच्या वतीने हिंदूह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दशावतार कलाकारांचे सत्काराच्या कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देवबाग पंचक्रोशीतील २५ दशावतार कलाकारांचे सत्कार पार पडला. या वेळी ज्येष्ठ दशावतारी कलाकार श्री. जी. जी. चोडणेकर बोलताना म्हणाले ३५ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले…अनेक चढ उतार अनेक अडचणींवर मात केली…अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते झी गौरव ने पुरस्कार….अर्थात हा सत्कार माझा नसून या देवबाग गावचा आहे.


या वेळी देवबाग पंचक्रोशीतील २५ दशावतार कलाकारांचे सत्कार पार पडला यात आनंद मेस्त्री, बाबा उपरकर , बाबू मांजरेकर, यशवंत मांजरेकर,विनोद देऊलकर, निलेश देऊलकर,मंगेश खोबरेकर, रुपेश लोंढे,सायबा केळुसकर, गिरिधर गावकर,रवी भांजी,विजय मालंडकर,भाऊ गोवेकर,गजानन मांजरेकर, जिजी राऊळ,महेश तांडेल,दिनेश राऊळ,नंदकिशोर कांदळगावकर,विजय चोपडेकर,तुषार चोपडेकर, विलास तांडेल,मुकेश कांदळगावकर,बाबी राऊळ,सिद्धेश देऊलकर,उमेश परुळेकर यांना सामंत कार्यात आले.

Related Stories

उपळे विजेता, ओणी उपविजेता

Patil_p

अपंगत्व दाखल्यांसाठी दिव्यांगांची हेळसांड नको

NIKHIL_N

श्रीलंकेतील मालवाहक जहाज अडकले

NIKHIL_N

बीएसनल टॉवरच्या सुविधेसाठी माजी सरपंचांचा उपोषणाचा इशारा

Anuja Kudatarkar

रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका घेणाऱया नगरसेवकांचे समन्वय समितीकडून कौतुक

Patil_p

सिंधुदुर्गात ‘बर्निंग बोगी’चा थरार

NIKHIL_N