Tarun Bharat

सत्तरीत मतदानासाठी यंत्रणा सज्ज

Advertisements

550 कर्मचाऱयांची नियुक्ती : 94 केंद्रांवर होणार मतदान : निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांची माहिती

प्रतिनिधी /वाळपई

सत्तरी तालुक्मयात एकूण बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी 94 केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार. आहे. यासाठी जवळपास 550 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व कर्मचाऱयानीं मतदान केंद्रांचा ताबा घेतल्याची माहिती निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांनी दिली.

 आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी संबंधित सर्व कर्मचाऱयांना  आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, असे निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांनी स्पष्ट केले.

सत्तरी तालुक्मयातील सर्व मतदान केंद्रावर दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व कर्मचारी विना अडथळा पोहोचले असून सर्वांनी मतदान केंद्राचा ताबा घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरला या ठिकाणी मतदान केंद्राचा ताबा कर्मचाऱयांनी घेतल्याचे यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले.

भरारी पथक सक्रिय!

पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथक सक्रिय करण्यात आलेली आहे. सर्व पथकाला योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून मतदान केंद्रावर भेटी देऊन ते या संदर्भाचा आढावा घेणार आहेत. कोणी गोधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास संबधितावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त!

वाळपई पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्याशी संपर्क साधला असता सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच मतदान प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. यामुळे कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, अशी सूचनाही फडते यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस खात्याचे भरारी पथक वेळोवेळी विविध मतदान केंद्रांना भेटी देणार आहे. कोणत्याही क्षणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश निरीक्षकांनी दिलेले आहेत.

 11 उमेदवार बिनविरोध

सकाळी तालुक्मयात एकूण बारा ग्रामपंचायत आहेत. या बारा ग्रामपंचायतीमधून एकूण 94 प्रभाग आहेत?. त्याच्या प्रभागातून आतापर्यंत 11 पंच सभासदांची बिनविरोध निवड झालेली आहे. उर्वरित प्रभागांमध्ये बुधवारी निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्या पंच सभासदांमध्ये

पंचायतनिहाय बिनविरोध झालेले उमेदवार

म्हाऊस-सोमनाथ काळे. ठाणे पंचायत-सरिता गावकर, सुभाष गावडे, नीलेश परवार. गुळेली पंचायत-अक्षिता गावडे, नितेश गावडे. भिरोंडा पंचायत-उदयसिंह राणे, मनीषा पिळयेकर. पिसुर्ले पंचायत-राजश्री जल्मी. होंडा -सुमेधा माडकर. सावर्डे -शिवाजी देसाई.

273 उमेदवार रिंगणात.

बारा पंचायतीसाठी एकूण 273 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. यात पिसुर्ले-13, होंडा-36, खोतोडा-22, पर्ये-36, गुळेली-16, भिरोंडा-13, ठाणे-25, सावर्डे-22, नगरगाव-21, केरी-28, म्हाऊस-18, मोर्ले-23.

Related Stories

नेव्हल एव्हिएशन म्युझीयमचा आज 23 वा वर्धापनदिन

Amit Kulkarni

भूमिपुत्र विधेयक न्यायालयात होणार रद्द

Amit Kulkarni

आतापर्यंत 44 हजार कामगारांनी सोडला गोवा

Omkar B

गोवा डेअरीसाठी 100 टक्के मतदान

Amit Kulkarni

सांखळी- कारापूर पुलाचे आज मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Amit Kulkarni

समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणाऱया योजनेची रक्कम काही दिवसात मिळणार

Omkar B
error: Content is protected !!