रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प, वीजपुरवठा ख्ंाडित


प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागात बुधवारी संध्याकाळी वादळी वाऱयासह पडलेल्या जोरदार पावसाचा तडाखा बसून जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱयाने घरावर झाडे पडून अनेकांचे नुकसान झाले. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची धांदल उडाली. पावसाचा काजू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.
सत्तरीत बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी पाऊस पडणार अशी अपेक्षा होती. संध्याकाळी पाच वाजता वादळी वाऱयासह पावसाची जोरदार सुरवात झाली. वादळामुळे अनेक भागांत झाडांची पडझड झाली. अनेक ठिकाणी घरावर झाडे पडल्यामुळे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अग्नीशामन दलाचे जवान झाडे हटविण्याच्या कामास लागले असल्याचे दिसून आले.
जनजीवन विस्कळीत
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. नगरगाव सावर्डे पंचायत क्षेत्रातून वाऱयाची सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे वाळपई व तालुक्मयाच्या इतर भागामध्ये जोरदार वादळी वारा झाला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडून जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या.
गोळावली, वाळपईत घरांचे नुकसान
गोळावली येथे एका घरावर जंगली झाड पडल्यामुळे घराचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. वाळपई हातवाडा येथे माडाचे झाड घरावर पडल्यामुळे बरेच नुकसान झाले.
दाबोस येथे रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे ठाणे, नगरगाव व इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाला. वीजवाहीनीचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारातून नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
वाळपईत रस्ता पाण्याखाली
जवळपास एक तास पावसाने जोरदार सलामी दिली. यामुळे वाळपई वन प्रशिक्षण केंद्रा समोर असलेला रस्ता पाण्याखाली गेला. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला?. मात्र पाऊस गेल्यानंतर पाणी कमी झाल्याने रस्ता मोकळा झाला.
अग्निशामक दलाचे कार्य सुरू
वादळी वाऱयामुळे सत्तरीत झाडांची पडझड झाल्याने अग्निशामक दलाचे जवान कामाला लागले. ज्या ठिकाणी झाडे पडून रस्ता बंद झाला सदर ठिकाणी रस्ता मोकळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच ज्या घरावर झाडे पडून नुकसान झाले सदर ठिकाणी जवान घरावरील झाडे हटवत होते. रात्री उशिरापर्यंत काम सरू होते.
सांखळी परिसरात पावसाच्या सरी; वातावरणात गारवा
सांखळी शहर आणि परिसरात बुधवारा दि. 23 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता सुमारे दीड तास पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने लोकांना हायसे वाटले. तापलेल्या झाडांनाही थोडासा थंडावा मिळाला असल्याचे पाळी, वेळगे, सुर्ल, कुडणे, न्हावेली, आमोणा, हरवळ येथील नागरिकांनी सांगितले.
सांखळी मतदारसंघात काही ठिकाणी प्यायला पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे अंगणातील, पोरसातील झाडांची रोपटी काशी जगवावी असा प्रश्न लोकांना पडला होता. बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी पडल्याने अनेकानी वरूण देवाचे आभार मानले. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध आणि हवेत आलेला गारवा या मुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला.
पाऊस काजू बागायतीना लाभदायक
राज्यात सध्या काजुची झाडे लागवडीसाठी सज्ज झाली आहेत. झाडांना पूर्ण मोहर आला असून त्यातील सुकलेला मोहर धुऊन काढण्यास पावसाचा उपयोग होतो. तसेच राहिलेल्या मोहराला फ्ढळ धारणा होण्यास मदत होते. यामुळे अचानक पडलेला हा पाऊस काजू बागायतींना लाभदायक असल्याचे बागायतदारांनी सांगितले.
मान्सूनपूर्व कामांना गती
मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाचे आगमन होत असल्याने सरकारी आणि बिगर सरकारी पातळीवर केल्या जाणाऱया मान्सूनपूर्व कामांना सुरवात होऊन वेग मिळतो. अनेकजण घर दुरुस्तीची कामे या वेळेत करत असतात यामुळे पाऊस पडल्याने कामांना गती मिळते, असे काही लोकांचे म्हणणे आहे.