Tarun Bharat

सत्तरी तालुक्मयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचे

वाळपई परिसरातील व्यापाऱयांना वाढीव वेळेची मोकळीक : टप्प्याटप्प्यात विसर्जन करण्याचे आवाहन

वाळपई / प्रतिनिधी 

सत्तरी तालुक्मयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसाचा उत्सव साजरा करणार आहेत. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी साजरा करताना गणेश भक्तांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वां®ाs काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे विसर्जन करताना आवश्यक स्वरूपाची काळजी घ्यावी. वाळपई येथील दुकानदारांनी गणेश चतुर्थीच्या काळात सामाजिक अंतर राखून ग्राहकांना सेवा द्यावी. त्याचप्रमाणे रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्यास त्यांना मोकळीक देण्यात आलेली आहे .

यासंदर्भात एक महत्वाची बैठक वाळपई नगरपालिकेच्या सभागृहात संपन्न झाली. याबैठकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी दशरथ गावस नगराध्यक्ष अख्तर शहा उपनगराध्यक्ष परवीन खान नगरसेवक अनिल काटकर रामदास शिरोडकर, अतुल दातये, सर्फराज सय्यद रशिकांत चारी परवीन शेख अंजली चारी सेहझीन शेख राज्याचे माजी उपसभापती नरहरी हळदणकर व इतर यांची खास उपस्थिती होती. यावेळी दशरथ गावस यांनी मार्गदर्शक तत्त्वां®³ाा संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली .

सत्तरी तालुक्मयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव यांना दीड दिवसाचा उत्सव साजरा करणार आहेत. यात वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव ,वाळपई पोलिस प्रशिक्षण गणेशोत्सव, वाळपई पोलीस गणेशोत्सव, ठाणे गणेशोत्सव व केरी गणेशोत्सव दीड दिवसांचा उत्सव साजरा करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

टप्प्याटप्पात विसर्जन करणार.

दरम्यान यासंदर्भात उपस्थित असलेल्या वेगवेगळय़ा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पदाधिकाऱयांनी गणेश विसर्जन संदर्भात सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी विसर्जन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले असून वाळपई सार्वजनिक गणेश मूर्ती  संध्याकाळी 4 पर्यंत वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रावर ही मूर्ती 4.30 वाजेपर्यंत व पोलीस स्थानकावरील मूर्ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विसर्जित करण्यात येणार आहे .यावेळी मिरवणुकाना प्रतिबंध करण्यात आला असून त्यानंतर नगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील विसर्जन संध्याकाळी पाच ते रात्री दहापर्यंत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे .यासंदर्भाचे नियोजन करण्यात आले.

वाळपईच्या दुकानदाराना वाढीव वेळ.

दरम्यान वाळपई नगरपालिका क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीचा बाजार भरत असतो. यामुळे दुकानदारांनी सामाजिक अंतर राखून ग्राहकांना सेवा देण्याचे आदेश मुख्याधिकारी तथा मामलेदार दशरथ गावस यांनी दिले .यासंदर्भात उल्लंघन झाल्यास दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. गरज पडल्यास दुकानदारांनी उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवून ग्राहकांना सेवा द्यावी मात्र दुकानासमोर गर्दी होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यासंदर्भात वाळपई पोलिसांना  देखरेख करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

गणेशमूर्ती शाळांमध्ये पोलीस नियुक्ती करणार.

दरम्यान गणेशमुर्ती शाळांमधून गणेश बाप्पाची मूर्ती देण्यासाठी गर्दी होऊ नये. त्याचप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन व्हावे यासाठी सत्तरी तालुक्मयातील सर्व गणेश मूर्ती शाळांमध्ये  पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे .शुक्रवारी व शनिवारी यादोन दिवसात पोलिसांची नियुक्ती गणेश शाळात होणार असून यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन दशरथ गावस यांनी केले आहे.

विसर्जन स्थळी विजेची सोय करणार. दरम्यान ज्या ठिकाणी गणेश बाप्पाचे विसर्जन होणार आहे .त्याठिकाणी विजेची व्यवस्था करण्याचे आदेश वीजखात्याला देण्यात आलेले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही विसर्जनाच्या ठिकाणी यासंदर्भातची व्यवस्था करण्यात आल्याचे वीज खात्याच्या प्रतिनिधीने या वेळी स्पष्ट केले.

Related Stories

काणकोण कोमुनिदादीच्या अध्यक्षपदी किसन ना. गावकर

Amit Kulkarni

आमदार मिलिंद नाईक यांच्याविरूध्दचे काँग्रेसचे षडयंत्र फसले- मुरगाव भाजपा मंडळ

Amit Kulkarni

‘इफ्फी’काळात सुरळीत वाहतुकीस सहकार्य करावे

Amit Kulkarni

म्हापसा नगराध्यक्षपदी शुभांगी वायंगणकर निश्चित

Amit Kulkarni

उसगांव दुचाकी अपघातात युवक ठार

Patil_p

डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या छळाचा दावा तथ्यहीन

Amit Kulkarni