Tarun Bharat

सत्तरी तालुक्यातील जमीन मालकीचा प्रश्न व्यापक करणार

वाळपई / प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे आता सत्तरी तालुक्मयाच्या सर्व गावांमध्ये जनजागृतीच्या बैठका घेण्यात येत असून येणाऱया काळात व्यापक स्वरूपाची सहभाग घेऊन या प्रश्नासंदर्भात सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील सर्व जमीन मालकानी याआंदोलनाला आपला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विनंती जमीन मालकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केला आहे. यासंदर्भात एक महत्वाची बैठक आज वेळूस येथील देवस्थानच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी सत्तरी तालुक्मयातील सर्व पंचायत क्षेत्रातील नियुक्त करण्यात आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुढील बैठक व सभा घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले.

 यासंदर्भाची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न अजूनही अधांतरी राहिलेला आहे. ा प्रश्न सरकारने सोडवावा अशा प्रकारची मागणी वारंवारपणे करण्यात आली होती .मात्र कोणत्याही सरकारने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आता या प्रश्नासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृतीला प्रारंभ झालेला आहे  .याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असून येणाऱया काळात सरकारने जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन या भागातील भूमिपुत्रांना जमिनीची मालकी द्यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात मोठे आंदोलन उभे करण्यात येणार असून यासंदर्भात जनजागृती सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा गावांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. वेगवेगळय़ा गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत आहे .आज घेण्यात आलेल्या वाळपई येथील एका महत्त्वाच्या बैठकीत राजेश गावकर रणजीत राणे दशरथ मांदेकर गणपत गावकर यांनी वेगवेगळय़ा स्तरावर मार्गदर्शन केले. येणाऱया काळात व्यापक स्वरूपाची सहभाग घेऊन सरकारला जाग आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतील .मात्र यासाठी जमीनमालकांना मोठय़ा प्रमाणात सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे .हा प्रश्न पूर्णपणे राजकीय विरहित असून प्रत्येकाच्या हक्काचा आहे  .त्यामुळे जोपर्यंत जमीन मालकीचा हक्क प्राप्त होत नाही तोपर्यंत या भागातील जमीन मालक पूर्णपणे परावलंबी झालेले आहेत. कृषी खाते त्याचप्रमाणे इतर स्वरूपाच्या सुविधांचा लाभ घेता येत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही  .यासंदर्भातील जाणीव या भागातील लोकप्रतिनिधींना पूर्णपणे आहे तरीसुद्धा याकडे का गंभीरपणे लक्ष देण्यात येत नाही यासंदर्भात अनेकनी चिंता व्यक्त केली. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून सरकारने यावर खऱया अर्थाने यास्वरूपाचे धोरण जाहीर केल्यास सत्तरी तालुक्मयातील जवळपास 70 टक्के जनतेला याचा फायदा होणार आहे .त्या dद्ष्टीनं प्रयत्न करण्यात येणार आहे .सत्तरी तालुक्मयातील नागरिकांनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाला व त्यानंतर भाजपाला चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. मात्र आज दुर्दैवाने दोन्ही पक्षांची सरकारी असताना सुद्धा या प्रश्नाला खऱया अर्थाने न्याय मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

     आयआयटी आंदोलनाला पाठिंबा.

 दरम्यान आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये गुळेली येथे आयआयटी प्रकल्प विरोधी आंदोलनाला पूर्णपणे पाठींबा व्यक्त करण्यात आला. सदर ठिकाणी वाडवडिलांपासून जमिनी उपभोग घेण्यात येत आहेत .तरीसुद्धा या जमिनीवर सरकारने हस्तक्षेप करून प्रकल्प आणल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारचा प्रयत्न सरकार उद्या कोणत्याही जागेमध्ये करू शकतो .यामुळे या भागातील भूमिपुत्रांवर मोठा अन्याय होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे आज गुळेली जनतेवर आलेली परिस्थिती सत्तरी तालुक्मयातील कोणत्याही गावांमधील नागरिकावर येण्याची शक्मयता असल्यामुळे आताच जमीन मालकांनी सतर्क व जागृत होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.  यासंदर्भात आपला पूर्णपणे पाठींबा आयआयटी विरोधी आंदोलनाला जाहीर करण्यात आला.

Related Stories

मान्सनपूर्व तयारीची बैठक संपन्न

Amit Kulkarni

गोवा बागायतदारकडून सतराशे टन काजू खरेदी

Omkar B

कुंकळ्ळीतही मुसळधार पावसामुळे समस्या

Amit Kulkarni

एमव्हीआर कंपनी विरोधात पेडणेत तीव्र संताप

Omkar B

बोरी साईबाबा मंदिरतर्फे 5 लाखांची मदत निधी

Omkar B

सांखळीवासीयांमुळेच राज्याचा विकास करण्याची संधी

Patil_p