Tarun Bharat

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

आरएसएफ” या जागतिक संस्थेचा अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

भारताच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षात प्रसिद्धीच्या सर्वाधिक टोकावर पोहोचलेले नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख झाली होती. पण सद्या देशातील लोकप्रियता आणि खोट्या माहितीच्या आधारे नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करतात अशी माहीती जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या ”रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स” (आरएसएफ) या संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे.

भारतातील प्रमुख विरोधी पक्ष वारंवार, अशी टीका करत आले आहेत की, देशातील प्रमुख प्रसार माध्यमे सरकारचा अजेंडा घेऊन काम करतात. यालाच अधिक बळकटी देणारा अहवाल असल्याने मोदी सरकारला आपली ही ओळख खोडून काढणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स (आरएसएफ) या संस्थेने आपल्या अहवालात स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या तसेच निर्दयी गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग -उन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपींग यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत मोदींचा ही समावेश करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांची गळचेपी करणाऱ्या यादीत जगभरातील ३७ नेत्यांची वर्णी लागते. यात रशियाचे पुतिन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो इराणचे अली खामेनी, सिरीयाचे बशर अल असद, म्यानमार लष्कर जनरल मीनन आऊंग हिलींग, बांग्लादेशच्या शेख हसीना अशा नेत्यांचा समावेश आहे. या अहवालात मोदींचा उल्लेख सत्तेत आल्यापासुन प्रसारमाध्यमांची गळचेपी करणारा नेता असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या जागतिक यादीत 2021 साली 180 देशांपैकी भारत 142 व्या क्रमांकावर असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी हे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या इकोसिस्टीमच्या मदतीने त्यांना विरोध करणाऱ्या प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करतात असंही यात म्हटले आहे.

येथे क्लिक करुन पहा संपुर्ण देशांची यादी……

Related Stories

लिहायची सवय सुटतेय, एकाग्रचित्तही नाही!

Patil_p

‘अग्नि प्राईम’ची यशस्वी चाचणी

Patil_p

संजय राऊतांना बेळगाव न्यायालयाचे समन्स ; तर कोर्टात बोलावून अटक करण्याचा डाव- संजय राऊत

Archana Banage

आदिनाथ साखर कारखान्याची निवडणुक लढवणार : आमदार संजय शिंदे

Abhijeet Khandekar

एअर इंडियाच्या लिलावाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

स्पुतनिक लाईटच्या आपत्कालीन वापरास DCGI ची मंजुरी

datta jadhav