Tarun Bharat

सदगीर, पृथ्वीराज, सिकंदर, माऊलीची आगेकूच

महाराष्ट्र केसरी बाला रफिक, वेताळ शेळके, संग्राम पाटील यांचे आव्हान संपुष्टात

फिरोज मुलाणी / सातारा :

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता रंगात आली आहे. पहिल्या दिवसांपासून सुरु झालेले धक्कादायक निकालाचे मालीका आजही कायम राहिली. माती गटात मुंबईच्या नवख्या विशाल बनकरने महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला पराभवाचा धक्का दिला. याच गटात माऊली जमदाडे, सिकंदर शेख, विशाल बनकर आणि गादी गटात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिर, हर्षद कोकाटे, अक्षय शिंदे आणि पृथ्विराज पाटील यांनी विजयी आगेकुच कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.  

आज सायंकाळच्या सत्रात खुल्या गटातील अतीशय चुरशीने झालेल्या लढतीत महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याच्या इरादय़ाने जेते पदाकडे वाटचाल करणाऱया वाशिमच्या सिकंदरने गोंदियाच्या वेताळ शेळकेची विजयी घौडदौड थांबवली. पहिल्या फेरीत आक्रमकपणे लढणाऱया सिकंदरने आज बचावात्मक पवित्रा घेवून आपल्या लढण्याची चाल बदलली होती. वेताळ सिकंदरचा भक्कम बचाव भेदण्यात अपयशी ठरल्याने पहिल्या फेरीत पिछाडीवर होता. दुसऱया फेरीत सिकंदरने गिअर बदलत गुणांचा फलक हलता ठेवला. एकेरी पट आणि भारंदाजसारख्या हुकमी डावावर नवख्या वेताळचा फडशा पाडला.  

अमरावतीच्या माऊली जमदाडे पुढे नांदेडचा अनिल जाधव अपयशी ठरला. माऊलीने तांत्रीक गुणाधिक्याने हि लढत खिशात टाकली. सोलापुरचा महेंद्र गायकवाड आणि मुंबईचा भारत मदने यांच्यातील लढतीत सुरुवाती पासून भारतला वरचढ ठरु दिले नाही. एकेरी पट आणि पुट्टी डावावर गुणांची कमाई करत अंतीम क्षणी चितपटीने विजय मिळवला. मुंबईच्या विशाल बनकरने बिडच्या सुरज मुंडेला गुणांचे खाते उघडण्याची संधी न देता. अवघ्या 45 सेकंदात तांत्रीक गुणाधिक्याने विजयाचा झेंडा फडकवला. गादी गटात कोल्हापुरचा संग्राम पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यातील दोन्ही फेरीत सदगीर वरचढ ठरला. वारंवार सुरु मारुन पट काढण्याचा संग्रामचा प्रयत्न अपयशी ठरुन सदगीरने गुणाची बढत घेत हि लढत शून्य विरुध्द पाच गुणांनी जिंकली. याच गटात बलदंड ताकदीच्या अक्षय मदनेला पुण्याच्या हर्षद कोकाटे याने घरचा रस्ता दाखवला हर्षदच्या आक्रमनामुळे हर्षदची डाळ शिजली नाही. सुरुवातीपासूनच बीडच्या अक्षय शिंदेची आगेकुच आज देखील कायम राहिली. औरंगाबादच्या मेघनाथला उच्च कलात्मक डावाचे प्रदर्शन करत तांत्रिक गुणाधीक्याने धुळ चारली. कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्विराज पाटील नगरच्या सुदर्शन खोतकरचे तुफानी हल्ला परतवून लावत प्रतिष्ठेची लढत 10 विरुध्द 4 गुणांनी जिंकली याच लढतीत सुदर्शने मारलेल्या भारंदाज डावावर पृथ्वीराजचा भक्कम बचावाचे प्रदर्शन केले. ततपुर्वी तिसऱया फेरीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पुढे सातरच्या दिग्विजय जाधवची मात्रा चालली नाही. पृथ्वीने दिग्विजयला गुणाचे खाते देखील उघडता आले नाही. सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि विशाल बनकर यांच्या लढतीत विशालने बाला रफिकचा दबाव झुगारुन सुरुवातीचे हल्ले वगळता त्याला संपुर्ण लढतीत त्याला डोईजड होवू दिले नाहीत. हि लढत तांत्रीक गुणाधिक्याने जिंकून बाला रफिकचे डबल महाराष्ट्र केसरीचे स्पप्न धुळीला मिळवले.   

दिग्गजांना पराभवाचा धक्का..
उपउपांत्य फेरीत लढतीत आज महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ दावेदार असलेल्या दावेदारांना अनपेक्षीतपणे पराभवाचे तोंड पहावे लागले. यामध्ये हिंगोलीचा गणेश जगताप, बुलढाण्याचा बाला रफिक शेख, कोल्हापुरचा कौतुक डाफळे, मुंबईचा भारत मदने, कोल्हापुरचा संग्राम पाटील, जालन्याचा विलास डोईफोडे,  गोंदीयाचा वेताळ शेळके यांच्यावर प्रतिस्पर्ध्यांनी मात केल्यामुळे पराभवाची धूळ पचवावी लागली.  

कोल्हापुरच्या गंगावेशची घौडदौड कायम
महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूरच्या विजय गंगावेश तालमीतील माऊली जमदाडे, सिकंदर शेख आणि विशाल बनकर या मल्लानी आपआपल्या गटातील लढतीत जिंकून मैदानी कुस्तीप्रमाणे महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात देखील विजय पताका फडकवत ठेवली. कुस्ती शौकिनानी गंगावेशच्या मल्लाच्या जिगरबाज खेळीचे कौतुक केले.

सोलापूर जिल्हय़ाचे मल्ल समोरा-समोर
महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात मुळचे सोलापुरचे असलेले मात्र बाहेरील जिल्हय़ाचे प्रतिनिधीत्व करणारे महेंद्र गायकवाड विरुध्द दत्ता नरळे (मुंबई), विशाल बनकर (मुंबई) विरुध्द बाला रफिक शेख बुलढाणा, सिकंदर शेख वाशीम विरुध्द वेताळ शेळके गोंदीया.

Related Stories

कोकणातून टिपलेल्या ओरियन नेबूलाच्या छायाचित्रांचे जगभर कौतुक

Archana Banage

पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम आता मराठीत

Archana Banage

कराडाजवळ कार उलटून अपघात

Amit Kulkarni

सातारा जिह्याचा पोषण अभियानच्या यशाबद्दल विशेष सन्मान

Patil_p

घोडेबाजार टाळण्यासाठी मविआनं पाऊल उचललं आहे- संजय राऊत

Archana Banage

कांद्यावरची निर्यात बंदी हटाव:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव

Patil_p