Tarun Bharat

सदरबाजारमधील अवैध व्यवसायिकांवर कारवाई करा

प्रतिनिधी/ सातारा

सदरबाजार परिसरात अवैध व्यावसाय हा अजय राठोड व त्याचे सात ते आठ मित्र चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे निवेदनाद्वारे जवान को-ऑप हौसिंग सोसायटीच्यावतीने करण्यात आली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सदरबाजार येथील अजय देवराम राठोड व त्याचे सात ते आठ मित्र हे बेकायदेशीर दारु विक्रीचा व्यवसाय करत आहेत. सोसायटीच्या संचालक मंडळांनी त्यांना बोलावून हा व्यावसाय बंद करण्याची विनंती केली होती. तसेच यापूर्वीही असा अर्ज केला होता. या व्यवसायामुळे आमच्या सोसायटी जवळपासचे सदस्य व इतर नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. हे दारु, गांजा व इतर नशिली पदार्थाची विक्री होत असल्याने आमच्या सोसायटीचे नाव मलिन होत आहे. तथापि आमच्या सोसायटीचे सदस्य बाळकृष्ण जाधव यांना अजय देवराम राठोड, जयसिंग जनार्दन कांबळे, शुभम अजय जाधव, बाबा अजय जाधव, अनिल मोहिते व अन्य काहींनी घरात घुसून मारहाण केली होती. तसेच आजुबाजुच्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा, एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

Related Stories

कोल्हापूर : गायीचे पवित्र दुध पिऊन न्याय बुद्धीने निर्णय घ्या

Archana Banage

केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही

Amit Kulkarni

गुहागर येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

Archana Banage

लस नाही तर प्रवेश नाही

datta jadhav

खवय्यांची पावले वळु लागली मासळी बाजाराकडे

Amit Kulkarni

जम्बो कोविड सेंटर परिसर स्वच्छ करण्याची परवानगी मिळवण्याची मागणी

Amit Kulkarni