Tarun Bharat

सदलग्यात अरण्यसिद्धेश्वर परिसरात अतिक्रमण नको धनगर समाजाची मागणी

धनगर समाजाच्या महिला पुरुषांचा भव्य मोर्चाने मुख्याधिकारी व उपतहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी / सदलगा

सदलगा शहरातील पुरातन अरण्यसिद्धेश्वर देवस्थानाच्या भोवताली असलेल्या जागेवर अतिक्रमण होत आहे ते थांबवण्यासाठी आज नगरपरिषद कार्यालय व  उपतहसिलदार कार्यालयात समस्त धनगर समाजाकडून निवेदन देण्यात आले.
या देवस्थानाच्या सभोवती होन्नसिद्धेश्वर, भूताळसिद्ध, ब्रह्मदेव, लक्ष्मीदेवी, जानम्मादेवी, हनुमान मंदिर, विठ्ठलबिरदेव गादी, कनकदासभवन अय्यप्पास्वामी देवालय अशी मंदिरे आहेत. इथे अमावास्या, पौर्णिमा यादिवशी अन्नदान होत असते, साधू संत स्वामींचे देहावसान झाल्यास याच परिसरात त्यांचा अंत्यविधी होत असतो, या सर्व देवस्थानाला भारतातील कानाकोपऱ्यातून भक्त येत असतात, वर्षांतून श्रावण, महाशिवरात्री दिवशी प्रवचन, कीर्तन होत असतात, जत्रा यात्रा दरम्यान जनावरांचा बाजार, कुस्तीचा फड भरत असतो, याच परिसरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम सतत सुरू असतात, लग्न कार्ये होत असतात , अन्य गावातून पालखी भेटीसाठी येत असतात असे असताना काही लोकांनी या देवस्थानाच्या परिसरात येऊन अतिक्रमण करून मापं टाकून दगड रोवण्याचे काम केलेले निदर्शनास आले. ही पवित्र जागा देवस्थानाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांसच उपयोगिली जाते तिथे ही जागा कुणालाही अतिक्रमण करूं देऊ नये, कुठल्याही वाजपेयी, आश्रय योजनेला ही जागा देऊ नये केवळ धार्मिक कार्यक्रमासच ही जागा वापरण्यात येणार आहे असे आज निवेदन मोर्चाव्दिरे देण्यात आले. हा मोर्चा अरण्यसिद्धेश्वर मंदिरापासून नगरपरिषद नंतर चन्नम्मा सर्कलवरून उपतहसिलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला. हे निवेदन तहसीलदार पी बी शिलवंत यांच्यावतीने तहसिलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  एम. जी. हट्टी, शंकर हेग्गण्णावर, मारुती खिलारे तसेच नगरपरिषदेत मुख्याधिकारी ए टी कल्याणशेट्टी यांनी स्वीकारले. यावेळी अरण्यसिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कामण्णा बिळ्ळीकुरी, भरत हुगार, रायप्पा डांगे, महादेव घोबडे लक्ष्मण डांगे, संतोष हूगार, बाबासाहेब हूगार, मल्लाप्पा हेब्बाळे, रवी डांगे, महादेव महापती,, काशिनाथ कोळेकर आणि पाच सातशे महिला पुरुष नागरीक उपस्थित होते.

Related Stories

तानाजी गल्लीत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

जनसंपर्क कार्यालयाचे आज हिंडलग्यात उद्घाटन

Amit Kulkarni

शेवटचा श्रावण सोमवार शहर परिसरात उत्साहात

Amit Kulkarni

भांडणानंतर किणये येथे घर पेटविले

Patil_p

स्वागत नवीन वर्षाचे-काळजी घेण्याचे

Omkar B

पन्नी विकणाऱया दोघांना अटक

Amit Kulkarni