Tarun Bharat

‘सदाफुली’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ रोड येथील लोकमान्य ग्रंथालयात रविवारी ‘सदाफुली’ या कै. लीलाबाई पेठे व प्रतिभा आपटे यांच्या ‘कविता मायलेकींच्या’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष जगदीश कुंटे होते. व्यासपीठावर प्रा. अनघा वैद्य-गोडसे, शोभा लोकुर, प्रतिभा आपटे उपस्थित होत्या.

मान्यवरांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिभा आपटे यांनी प्रास्ताविकत ‘कविता मायलेकींच्या’ काव्यसंग्रहाचा आढावा घेतला. यावेळी शोभा लोकुर म्हणाल्या, प्रतिभा आपटे यांच्याकडे संवेदनशील मन असल्याने ‘सदाफुली’ असे या काव्यसंग्रहाला नाव दिले आहे. प्रतिभा आपटे यांनी लीलाबाई पेठे यांच्या स्मृती प्रेरणादायी असल्याचे या काव्यसंग्रहातून दाखवून दिल्याचे सांगितले.

यावेळी प्रा. अनघा वैद्य-गोडसे, जगदीश कुंटे यांनीही मनोगते व्यक्त केली. दुसऱया सत्रात आरती आपटे, अतुल पाटील, किशोर काकडे, हर्षदा सुंठणकर आदींनी ‘निळय़ा मोकळय़ा आभाळाशी’, ‘पंख’, ‘आठवण’, ‘माधुरी दीक्षित’, ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘शंभो हरीहरेश्वरा’ आदी कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. प्रतिभा आपटे यांनी लोकमान्य ग्रंथालयाला सप्रेम भेट दिली. यावेळी मंगल हेब्बाळकर, उज्ज्वला काकडे यांनी संगीतसाथ दिली. किशोर काकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रसिक श्रोते उपस्थित होते.

Related Stories

मनपाच्या ताफ्यात दाखल होणार 35 नवी कचरावाहु वाहने

Patil_p

महामार्ग रुंदीकरण कामातून दिलीप बिल्डकॉन कंपनी बाहेर?

Amit Kulkarni

हळद लागली मात्र अक्षता थांबल्या…!

Omkar B

‘त्या’ हेस्कॉम अधिकाऱयांची बदली करा

Amit Kulkarni

विकासकामांचा खर्चाचा बोजा मनपाच्या खजिन्यावर

Patil_p

ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱयांची तातडीने बदली करा

Amit Kulkarni