Tarun Bharat

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

माजी अष्टपैलू युवराज सिंगची खरमरीत टीका, विराट-रोहित वगळता अन्य कोणीही आदरास पात्र नसल्याचा दावा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सध्याच्या भारतीय क्रिकेट संघात केवळ दोनच रोल मॉडेल आहेत, ज्यांच्याकडे अन्य सर्व खेळाडू आदराने पाहतात. पण, या दोघांचा अपवाद वगळता अन्य एकही खेळाडू असा नाही, ज्याच्याबद्दल युवा खेळाडूंना आदर वाटेल, असे रोखठोक प्रतिपादन माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केला. आताचे सर्व खेळाडू सोशल मीडियामध्ये बुडालेले असतात. त्यामुळे, त्यांच्याकडे संवादासाठी वेळही नाही, असे तो आवर्जून म्हणाला. युवराजने वनडे उपकर्णधार रोहित शर्माशी इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट केले त्यात त्याने ही मते मांडली.

रोहितने या लाईव्ह चॅटमध्ये अनुभवी युवराज सिंगला सध्याच्या व मागील संघात किती फरक आहे, असा प्रश्न केला. त्यावर युवराज सिंग बोलत होता. ‘जेव्हा मी संघात आलो किंवा जेव्हा तू (रोहित) संघात आलास, त्यावेळी आपले वरिष्ठ खेळाडू अतिशय शिस्तबद्ध होते. शिवाय, लक्ष भरकटले जावे, यासाठी त्याकाळी सोशल मीडिया आजच्या इतका मजबूत नव्हता. त्यामुळे, आपल्या सर्वांचे लक्ष आपले वरिष्ठ खेळाडू कसे वागतात, ते माध्यमांशी कशा पद्धतीने संवाद साधतात, ते लोकांशी कसे बोलतात, याकडे असायचे. याचे कारण असे की, तेच खेळाडू आपल्या दृष्टीने खेळाचे आणि देशाचे राजदूत असायचे. पण, आता तशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही’, असे युवराज येथे म्हणाला.

प्रतिमेची काळजी घ्या

‘आताही तू विचारलेस तर मी हेच सांगेन की, भारतीय संघाकडून खेळल्यानंतर किंवा खेळत असताना देखील आपल्या प्रतिमेची काळजी आपण घ्यायलाच हवी. मात्र, आताच्या संघावर एक नजर टाकली तर त्यात विराट व तू, अशा दोघांचा अपवाद वगळला तर मला एकही खेळाडू त्या तोडीचा दिसत नाही. उर्वरित सर्व खेळाडूंचा प्रवास तळय़ात-मळय़ात स्वरुपाचा असल्याचा जाणवतो. ते फक्त संघात येत राहतात आणि जात राहतात. आताच्या संघात खूप वेगळी परिस्थिती आहे. कोई भी किसीको कुछ भी कह देता है’, असे युवराज पुढे रोहितला उद्देशून म्हणाला.

Related Stories

बोपण्णा-रामकुमार दुहेरीत अजिंक्य

Patil_p

शिवा थापा, टेबल टेनिस संघांची विजयी सलामी

Patil_p

जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर

Patil_p

स्पोर्ट्स mania

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघनिवड पुढील आठवडय़ात

Patil_p

कतार विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझील पात्र

Patil_p