Tarun Bharat

“सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होण्याच्या मार्गावर – सरन्यायाधीश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

प्रसार माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन गणली जात असली तरी, समाज माध्यमांच्या कामावर समाजातील अनेक स्तरावरुन नाराजी स्पष्ट केली जात आहे. समाजव्यस्थेत बदल घडवण्याची जबाबदारी असताना माध्यमे मात्र धनिकांची भाटगिरी करण्यात व्यस्त असल्याचे ही कित्येकदा आरोप झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण { Chief Justice NV Ramana }यांनी ही आपले मत व्यक्त करत माध्यमांच्या या बदलावर बोट ठेवले आहे.

१५ डिसेंबर रोजी पत्रकार सुधाकर रेड्डी लिखित ‘ब्लड सँडर्स’ [ ‘Blood Sanders: The Great Forest Heist’] या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान बोलत असताना सरन्यायाधीशांनी सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता [ The concept of investigative journalism  ] गायब होत आहे. आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे. असंच दाखवलं जात असल्याचं, मत व्यक्त केलं. यावेळी रमण यांनी त्यांची पहिली नोकरी ही पत्रकारितेची असल्याचं नमूद करत आपली पत्रकारीतेची नोकरी सुरु असताना वर्तमानपत्रात वेगवेगळे घोटाळे उघड करणाऱ्या बातम्यांविषयी आपली मत मांडली.

तसेच “ज्याची पहिली नोकरी पत्रकाराची होती असा व्यक्ती म्हणून मी आजच्या दिवशी माध्यमांवर काही विचार मांडण्याचं स्वातंत्र्य घेणार आहे असे म्हणत भूतकाळात शोध पत्रकारितेतून वेगवेगळे घोटाळे उघड व्हायचे, गैरव्यवहार समोर यायचे आणि त्यामुळे देशभरात पडसाद पडलेले आम्ही पाहिले आहेत. मात्र, सध्याच्या काळात एखाद दुसरा अपवाद सोडता अशा ताकदीची शोध पत्रकारिता पाहायला मिळत नाही. भारतात शोध पत्रकारिता नामशेष होत असल्याचं दिसत आहे.” असे म्हणत जणु लुप्त होत असलेल्या शोध पत्रकारीतेची पुन्हा आठवण करुन दिली. तसेच सरन्यायाधीश रमण यांनी आपल्या करियरची सुरुवात तेलगू वृत्तपत्र ईनाडूमधून पत्रकार म्हणून केली होती. असे ही यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

उपराष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेचा आरंभ

Patil_p

दत्तात्रय पाटोळे खूनप्रकरणी पाचजणांना नऊ दिवस पोलिस कोठडी : चौकशीसाठी काहीजण ताब्यात

Archana Banage

राज्य सरकार महिन्याच्या अखेरीस पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा घेणार निर्णय

Archana Banage

समृद्धी महामार्गाचे काम अभिमानास्पद : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

पंजाब काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट हॅक

Archana Banage

CM एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यात पक्षबांधणीला सुरुवात; महिला आघाडीला मिळणार संधी

Abhijeet Khandekar