Tarun Bharat

‘सप’वर भाजपचा काउंटर अटॅक

मुलायम सिंह यादवांच्या नातेवाईकाचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था / लखनौ

उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी परस्परांना चेकमेट देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. भाजपने काउंटर अटॅक करत आता मुलायम सिंह यादव यांचे जवळचे नातेवाईक आणि फिरोजबादच्या सिरसागंजचे आमदार हरिओम यादव यांना पक्षात सामील करून घेतले आहे. हरिओम यांच्यासह भाजपने सहारनपूर जिल्हय़ातील बेहटचे काँग्रेस आमदार नरेश सैनी आणि सपचे माजी आमदार धर्मपाल यादव यांनाही पक्षात प्रवेश दिला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्ष सोडल्याने भाजपला यापूर्वी झटका बसला आहे. परंतु ते समाजवादी पक्षात सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. तर हरिओम यादव हे सिरसागंजचे आमदार असून सध्या समाजवादी पक्षातून निलंबित होते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप होता. हरिओम हे मुलायम यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीत हरिओम यांनी भाजपला मदत केली होती. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील 6 जिल्हा परिषद सदस्यांना भाजपच्या बाजूने मतदान करायला लावले होते. याचमुळे फिरोजाबाद जिल्हय़ात भाजपला विजय मिळाला होता. अखिलेश यांचे काका रामगोपाल यादव यांच्याशी त्यांचे कधीच पटले नव्हते. दुसरीकडे ते शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय होते. शिवपाल यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Related Stories

न्या. चंद्रचूड यांचे घटनापीठ आता ‘हरित’

Patil_p

संरक्षण समितीच्या बैठकांना राहुल गांधींची कायम दांडी

Patil_p

‘आप’चे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद अटकेत

Patil_p

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी देवासमान ः राष्ट्रपती

Patil_p

सैन्यप्रमुख आजपासून युरोपीय देशांच्या दौऱ्यांवर

Patil_p

कोरोना रुग्णसंख्या 2 हजार पार

Patil_p