Tarun Bharat

सप्टेंबरमध्ये किरकोळ वाहन विक्रीत घसरण

Advertisements

सेमिकंडक्टरसह अन्य समस्यांची बसली झळ

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

चालू वर्षातील सप्टेंबर महिन्यात किरकोळ वाहन विक्री जवळपास 5.27 टक्क्यांनी घसरली आहे. कोरोना संकटाअगोदर सप्टेंबर 2019च्या तुलनेत सर्वसाधारण कार विक्री 13.5 टक्क्यांनी नकारात्मक राहिली आहे.

वाहनांची विक्री करणाऱया डिलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2021 मध्ये तीनचाकी वाहनांची विक्री 51 टक्क्यांनी वाढली आहे, तर वैयक्तिक वाहन विक्री ही 16 टक्क्यांनी मजबूत राहिली आहे. दुसऱया बाजूला व्यावसायिक वाहनांची विक्री याच दरम्यान 45 टक्क्यांनी तेजीत राहिली. मात्र दुचाकीची विक्री ही 12 टक्क्यांनी कमी राहिली आहे. तर ट्रक्टरची विक्री ही 24 टक्क्यांनी प्रभावीत झाली आहे.

साधारणपणे वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीचे आकडे पाहिल्यास यामध्ये वाहनांची किरकोळ विक्री वर्षाच्या आधारे 35 टक्क्यांनी वधारली आहे. वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत व्यावसायिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 172 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

सेमिकंडक्टरची समस्या सेमिकंडक्टरची टंचाई वाहनांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱया कंपन्यांना भेडसावत असल्याचे समोर येत आहे. याचा परिणाम हा देशासह जगभरातील वाहन निर्मात्यांना भेडसावत आहे. त्यांच्या वाहन उत्पादनावर परिणाम होतो आहे.

Related Stories

इलेक्ट्रिक कार उद्योगात स्पर्धा वाढणार

Amit Kulkarni

महिंद्राचे अंतिम तिमाहीत उत्पादन, विक्रीत घटीचे संकेत

Patil_p

‘ऑडी ए8एल’चे बुकिंग सुरु

Amit Kulkarni

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p

हिरो मोटोकॉर्पने विकल्या 1 लाख दुचाकी

Amit Kulkarni

महिंद्रा आणि महिंद्राची ट्रक्टर विक्री वाढली

Patil_p
error: Content is protected !!