Tarun Bharat

सफाई कामगाराच्या उपस्थितीत गांधी जयंती

हुबळी येथील गोकुळ रोड पोलीस स्थानकात कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

शनिवारी ठिकठिकाणी गांधी जयंती साजरी करण्यात आली. हुबळी येथील गोकुळ रोड पोलिसांनी आगळय़ावेगळय़ा पद्धतीने गांधी जयंतीचा कार्यक्रम केला. गेली 32 वर्षे सेवा बजावणाऱया सफाई कामगाराच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला.

गोकुळ रोडचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांच्या पुढाकारातून शनिवारी सकाळी गांधी जयंती साजरी करण्यात आली. सफाई कामगार सिध्दराम बसाप्पा यरमसाळ यांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रम करण्यात आला.

गरीब, दीनदुबळे, दलित, मागासवर्गीय आदी घटकांबद्दल महात्मा गांधीजींना विशेष काळजी होती. समाजातील जातीअंताचा शेवट करण्यासाठी सर्व घटकांना एकत्र करण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपले उभे आयुष्य खर्ची केले. या कार्यक्रमात त्यांचे स्मरण करण्यात आले.

Related Stories

• काळजी… मुलांसह सुना अन् नातवंडांचीही

Patil_p

मच्छे येथे ग्रा. पं. सदस्य़ांमध्ये हाणामारी

Patil_p

शिवसेनेतर्फे गणेश मूर्ती स्पर्धेचे बक्षिस वितरण

Rohit Salunke

बेळगावच्या तत्कालीन तहसीलदारांना 12 हजारांचा दंड

Amit Kulkarni

एक्स्ट्रीम, आर एम चौगुले संघ विजयी

Amit Kulkarni

कॅम्पमधील वाल्मिकी मंदिर हस्तांतर करण्यासाठी नोटीस

Patil_p