Tarun Bharat

सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी वेदांत, अवधूतची निवड

बेळगाव : बेंगळूर येथे बसवणगुडी स्विम सेंटर येथे झालेल्या एनआरजे राज्यस्तरीय सबज्युनियर, ज्युनियर व सिनियर ऍक्वेटीक जलतरण स्पर्धेत बेळगावच्या वेदांत मिसाळे व अवधूत दळवी यांची सबज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी 2 रौप्य व 10 कांस्यपदके मिळविली.

या स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लब व ऍक्वेरिअस क्लबच्या जलतरणपटूंनी यश मिळविले. वेदांत मिसाळेने 100 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य तर 50 मी. बटरफ्लायमध्ये कांस्य  मिळविले. अवधूत दळवीने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य तर 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य, सुनिधी लहकेरीने 100 मी. बॅकस्ट्रोक व 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये दोन कांस्य मिळविली. अखिला हलगेकरने 50 मी. व 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 2 कांस्य, समृद्धी हलगेकरने 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य, आर्यन पाटीलने 200 मी. बटरफ्लाय व 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 2 कांस्य, अनिश पैने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य, निधी कुलकर्णीने 100 मी. बॅकस्ट्रोक व श्लोक जाधवने 100 मी. फ्रीस्टाईलमध्ये चौथा क्रमांक पटकाविला. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक प्रसाद तेंडोलकर, अक्षय क्षीरसागर, अजिंक्मय मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर यांचे मार्गदर्शन तर डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, अविनाश पोतदार, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

ऍप्टेक एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थिनींची निवड

Amit Kulkarni

येळ्ळूर गावासाठी दररोज 500 जणांना लस पुरवठा करा

Omkar B

डीपी, फिनिक्स पब्लिक उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

गोकर्णनजीक तदडी बंदरात सापडला 500 किलोचा व्हेल शार्क मासा

Amit Kulkarni

गोगटे पीयू कॉलेजचा 89 टक्के निकाल

Patil_p

संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Patil_p