Tarun Bharat

सभापतींच्या निवाडय़ास आव्हान याचिकेवर आज सुनावणी

प्रतिनिधी / पणजी

आमदार अपात्रता प्रकरणी सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेला निवाडा फेटाळावा व ’त्या’ दहा आमदारांना अपात्र ठरवावे, यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या आव्हान याचिकेवर आज सोमवारी 7 जून रोजी सुनावणी होणार आहे.

काँग्रेसमधून भाजपात सामील झालेल्या 10 आमदारांना अपात्र का करावे याचे मुद्दे मांडण्यात आले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून सभापतींनी याचिका फेटाळली होती. त्या निवाडय़ातील सर्व त्रुटी नव्या याचिकेत उघड करण्यात आल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी याच विषयावरून सभापती सुनावणी घेण्यास तयार नसल्याने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयाने जाब विचारताच सभापतींनी याचिका निकालात काढली होती.

परंतु सदर निवाडा म्हणजे राजकारणात पक्षफुटीला खतपाणी घालणारा आहे, तसेच चुकीचा पायंडा पाडणारा आहे. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा, अशी याचना करण्यात आली आहे.

एखाद्या पक्षात उभी फुट पडली, विधिमंडळ गटातील सदस्यांसह पदाधिकारी आणि सामान्य सदस्यांपैकी दोन तृतीयांश गट दुसऱया पक्षात विलीन झाला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. परंतु पक्षाचे पदाधिकारी फुटले नाहीत,  केवळ आमदाराच फुटले आणि त्यांची संख्या दोन तृतीयांश असली तरीही ते अपात्र ठरतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Related Stories

मराठी अकादमीचे साहित्य पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni

पाच पालिकांचे भवितव्य आज

Amit Kulkarni

हरमल येथे विदेशी महिलेकडून सव्वा लाखांचा अमलीपदार्थ जप्त

Amit Kulkarni

वादळी वारा, पावसामुळे वास्को परिसरात पडझड

Amit Kulkarni

त्या आमदारांनी राजीनामा देऊन पक्षांतर करावे पक्षांतर विरोधी समाजसेवकांची वास्कोत निदर्शने

Omkar B

विरोधास विरोध केल्यास विकास थांबतो

Amit Kulkarni