Tarun Bharat

सभापती रउफ हजवानी यांचा उद्या होणार फैसला

दापोली / प्रतिनिधी:

दापोली पंचायत समितीचे विद्यमान सभापती रउफ हजवानी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात उद्या शुक्रवारी झूम ॲपद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आपल्या मोबाईलमध्ये झूम ॲप नाही व आपल्याला ते कसे वापरतात हे माहित नाही. असे म्हणून झूम ॲपद्वारे मीटिंग न घेता सभा ऑफलाइन घ्यावी अशी मागणी हजवानी यांनी केली आहे. याकडे प्रशासन यावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अविश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाणार- हजवानी

आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही. आपल्याला अनेकांनी आणि प्रकारे चुकीची कामे करण्याचा सल्ला दिला. शिवाय आपल्यावर दबाव देखील आणला. मात्र आपण कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही. यामुळे आपल्या पक्षातील व विरोधक देखील आपल्यावर नाराज आहेत. यामुळेच आपल्यावर अविश्वास दर्शक ठराव आणून आपल्यावर दबाव आणला आहे अशी घणाघाती टीका हजवानी यांनी तरुण भारतशी बोलताना केली आहे. शिवाय जर आपल्यावर अविश्वासदर्शक ठराव आणण्यात आला तर आपण पंचायत समितीमध्ये चालणारी या लोकांची काळी कामे प्रसारमाध्यमांसमोर मांडू असा सूचक इशारा देखील सभापती हरवानी यांनी तरुण भारतशी बोलताना दिला आहे. तसेच हा ठराव म्हणजे मुस्लिम समाजावर अन्याय असून आपण या विरोधात तालुक्यातील मुस्लिम समाजामध्ये जाऊन जागृती करणार असल्याचे देखील ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यामुळे दापोलीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Stories

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Patil_p

रत्नागिरी : पोलादपूर हद्दीत स्वीफ्ट कार जळून खाक

Archana Banage

ऐतिहासिक महानाट्य ‘रणांगण’ लवकरच रसिकांच्या भेटीला

Anuja Kudatarkar

गणपतीत चाकरमान्यांसाठीचे नियम आताच जाहीर करा!

NIKHIL_N

वस्त्रहरणकारांचे ‘विठ्ठल विठ्ठल’ लवकरच रसिकांच्या भेटीला!

Patil_p

रत्नागिरी : कोरोनामुक्त 6 महिन्याच्या बालकाला टाळयांच्या गजरात डिस्चार्ज

Archana Banage