Tarun Bharat

समडोळी येथे भीषण आग, तीन ट्रक पाईप जळाले

प्रतिनिधी / मिरज

तालुक्यातील समडोळी येथे गावात पाईपलाईनसाठी आणलेल्या प्लास्टिकच्या पाईपना भीषण आग लागली. सुमारे तीन ट्रक पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून झाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत माहिती मिळू शकली नाही.

समडोळी गावात सध्या पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी येथे तीन ट्रक पाईप आणून ठेवण्यात आल्या होत्या. सध्या दिवाळी निमित्त कामगारांना सुट्टी असल्याने काम बंद आहे. अचानक पाईप मधून धूर आला. बघता बघता पाईपच्या एका बंडलला आग लागली. सर्व पाईप प्लास्टिकच्या असल्याने काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केले. संपूर्ण गावात धुराचे लोट पसरले. या आगीत सर्वच्या सर्व पाईप जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवांनानी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली, याची माहिती मिळू शकली नाही.

Related Stories

मिरज-कृष्णाघाट उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरु होणार

Archana Banage

सांगलीत हिसडा टोळीकडून सोन्याची साखळी लंपास

Abhijeet Khandekar

ट्रॅक्टर व मोटरसायकलची धडक, शिक्षक जागीच ठार

Abhijeet Khandekar

सांगली : केंद्र व राज्य शासनाने माणसी पाच हजार मदत द्यावी : स्नेहल जाधव

Archana Banage

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी – आ.सुधीर गाडगीळ

Archana Banage

मिरजेत बिबट्याच्या कातड्याची तस्करी करताना एकजण ताब्यात

Archana Banage
error: Content is protected !!