Tarun Bharat

समर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेसाठी भूमीपूजन

प्रतिनिधी/ बेळगाव

श्री समर्थ प्रोजेक्टच्यावतीने मंगळवारपेठ, टिळकवाडी येथे उभारण्यात येणाऱया प्रकल्पातील तळ मजल्यावर श्री समर्थ अर्बन को-ऑप सोसायटीने आपल्या टिळकवाडी शाखेसाठी जागा नोंद केली असून त्या प्रकल्पाचे भूमीपूजन सोमवारी जागेचे मुळ मालक व जीआयटीचे माजी प्राचार्य आर. पी. जोशी आणि सौ. जोशी या दांपत्याच्या हस्ते करण्यात आला.

सध्या भाडय़ाच्या जागेत असलेली ही शाखा तेथे स्थलांतरीत केली जाणार आहे. समर्थ सोसायटीच्या मागीलवषीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना अभिवचन दिल्या प्रमाणे आम्ही ही जागा घेतली असून टिळकवाडी शाखा तेथेच स्थलांतरीत होणार आहे. संस्थेच्या बाकीच्या सर्व शाखा स्वतःच्या जागेत आहेत. फक्त टिळकवाडी शाखा ही भाडोत्री शाखेत असल्याने होणारी नवीन शाखा समर्थ सोसायटीचे वैशिष्टय़ असणाऱया स्ट्रॉंग रुम व सेफ डिपॉजीट लॉकरसह असणार आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन एन. डी. जोशी यांनी दिली. टिळकवाडी शाखा गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असून संस्थेच्या स्वतःच्या जागी असलेल्या सर्व शाखा उल्लेखनीय कार्य करीत आहेत, असेही एन. डी. जोशी यांनी सांगितले. यावेळी समर्थ प्रोजेक्टचे संचालक आनंद कुलकर्णी, वेंकटेश देशपांडे, प्रा. संध्या देशपांडे, सोसायटीच्या व्हा. चेअरमन सुहास कुलकर्णी, संचालक अजय सुनाळकर, गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, विनय कुलकर्णी, प्रदीपकुमार कुलकर्णी, अनिल भंडारी, परशराम काब्ंाळे, उमेश सुणगार, अशोक पुजेरी, संचालिका सुनंदा आळतेकर, छाया जोशी, सेपेटरी अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर राघवेंद्र केशनूर आदी उपस्थित होते.

Related Stories

कायमस्वरुपी पीडीओ नेमण्याची कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांची मागणी

Omkar B

पंत बाळेकुंद्री येथे टर्पेंटाईन पिऊन दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

Tousif Mujawar

कंग्राळी बुद्रुक वॉर्ड क्र. 2 मधील उमेदवारांना वाढता पाठिंबा

Patil_p

जाधवनगरमधील ‘त्या’ मैदानावरील अवैध प्रकार थांबविण्याची मागणी

Amit Kulkarni

परीक्षांबाबत सरकारने योग्य तो खुलासा करावा : अभाविपची मागणी

Omkar B

सुवर्ण सिंहासनासाठी शिंदोळी ग्रामस्थांतर्फे 1,01,101 रुपयांचा निधी सुपूर्द

Amit Kulkarni