Tarun Bharat

‘समर पॉपअप’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव

उत्सव सखीतर्फे क्रिएटिव्ह सोल्स अंतर्गत ‘समर पॉपअप’ प्रदर्शनाचे शनिवारी क्लब रोड येथील ईफा हॉटेलमध्ये थाटात उद्घाटन झाले. यावेळी वाहतूक व गुन्हे विभागाच्या उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, उद्योजिका ज्योत्स्ना पै यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाला सुरुवात झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. यावेळी उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी प्रदर्शनाची पाहणी करून गौरवोद्गार काढले. शिवाय महिलांना हे प्रदर्शन विक्रीसाठी प्रोत्साहन देणारे असल्याचे सांगितले.

Advertisements

या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण 20 स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. शिवाय या प्रदर्शनात इंडो वेस्टर्न पोशाख, चांदीचे दागिने, कुर्ता, ज्वेलरी, बनारसी, चंदेरी, माहेश्वरी, कॉटन साडय़ा, चप्पल, हॅण्डबॅग्ज यासह लहान मुलांचे डेस, गृह सजावट व इतर वस्तू मांडण्यात आल्या आहेत.

मागील 15 वर्षांपासून दरवषी महिलांना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी हे प्रदर्शन भरविले जात आहे. पुरुष, महिला आणि लहान मुलांच्या विविध वस्तू या ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनात बेळगावसह दिल्ली, आग्रा, इंदूर, मुंबई, कोल्हापूर, गोवा, बेंगळूर आदी ठिकाणांहून स्टॉलधारक दाखल झाले आहेत.

Related Stories

ट्रफिक सिग्नल पुन्हा बंद; रहदारी पोलीसही गायब!

Amit Kulkarni

खानापूर रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे

Amit Kulkarni

आता फळे-भाजीपाला विक्रेत्यांना मिळणार हातगाडी

Patil_p

बेळगावात ‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक’ कधी होणार?

Patil_p

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

Patil_p

विजापूर जिह्यातील मजुरांची वैद्यकीय तपासणी

Rohan_P
error: Content is protected !!