Tarun Bharat

समस्या स्लिप डिस्कची

Advertisements

स्लिप डिस्क हा आजार नसून तो शरीराच्या मशिनमधला एक तांत्रिक बिघाड आहे. वास्तविक डिस्क स्लिप होत नाही तर स्पाइनल कॉर्डमधून काही पदार्थ बाहेर येतात.

 • डिस्कचा बाहेरचा भाग हा मजबूत स्नायुंनी बनलेला असतो; तर मधल्या भागात एक तरल जेलीसारखा पदार्थ असतो. डिस्कमधील हा जेलीसारखा किंवा कुशनसारखा पदार्थ डिस्कमधून बाहेर येतो. डिस्कच्या पुढे आलेल्या भागामुळे स्पाइनल कॉर्डवर दबाव पडतो.
 • अनेकदा वयोमानानुसार हा तरल पदार्थ सुकून जातो किंवा अचानक झटक्यामुळे किंवा दबावामुळे स्नायू फाटतात किंवा कमजोर होतात. यामुळे पायांचे दुखणे वाढते.
 • भारतात 20 टक्क्यांपेक्षा जास्त लोक स्लिप डिस्कने ग्रस्त आहेत.

सर्वसाधारण कारणं

 • बसताना चुकीच्या पद्धतीने बसणे. झोपून किंवा वाकून वाचणे, अभ्यास करणे, कॉम्प्युटर समोर बसून राहणे.
 • अनियमित दिनचर्या, अचानक झुकणे, वजन उचलणे, झटका लागणे, चुकीच्या पद्धतीने उठणे, बसणे.
 • शारीरिक हालचाल कमी होणे, व्यायामाचा अभाव, न चालण्यामुळेही स्नायु कमजोर होतात. खूप
  थकल्यामुळेही पाठीच्या कण्यावर ताण येतो.
 • अत्याधिक शारिरीक श्रम, पडणे, घसरणे,अपघातामुळे जखम होणे, बराच काळ ड्रायव्हिंग करण्यानेही कण्यावर किंवा डिस्कवर ताण पडतो.
 • वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते आणि त्यामुळेही डिस्कवर ताण पडतो.

खास कारणं सांध्यांची झीज झाल्यामुळे.

 • कंबरेच्या हाडामध्ये किंवा पाठीच्या कण्यामध्ये जन्मजात विकृती किंवा संक्रमण.
 • पायामध्ये जन्मतःच काही विकार असणे.
 • वयाच्या 30 ते 50 वर्षाच्या दरम्यान कमरेच्या खालच्या भागात स्लिप डिस्कची समस्या होण्याची शक्यता असते. वयाच्या 40 ते 60 वर्षाच्या दरम्यान सर्व्हाइकल व्हर्टिब्रामध्ये समस्या होऊ शकते.
 • तज्ञांच्या मते आता 20 ते 25 वर्षाच्या तरुणांमध्येही स्लिप डिस्कची लक्षणं दिसू लागली आहेत. बराच काळ बसून काम करणे, खूप वेगात गाडय़ा चालविणे, सीट बेल्ट न बांधता गाडी चालविणे यामुळे या समस्या वाढत आहेत. अचानक ब्रेक लावल्याने शरीराला झटका बसतो आणि त्यामुळे डिस्कला मार बसू शकतो.

सामान्य लक्षणं

 • नसांवर दाब पडल्यामुळे कंबरदुखी, पायदुखी, पाय आणि पायाची बोटे सुन्न होणे.
 • पायाचा अंगठा किंवा पंजा कमजोर होणे
 • स्पाइनल कॉर्डच्यामध्ये दाब पडल्यामुळे अनेकदा मांडय़ा आणि त्याभोवतीचा भाग सुन्न पडणे.
 • कंबरेच्या खालच्या भागात असह्य वेदना.
 • चालणे, फिरणे, वाकणे यांसारख्या क्रिया करतानाही  प्रचंड वेदना होणे. वाकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे शरीरातून करंट पास होतोय असा अनुभव येणे.

निदान आणि उपचार

 • सीटी स्कॅन, एमआरआय, माइलोग्राफी या टेस्टने स्लीप डिस्कचे योग्य ते निदान होऊ शकते. स्लिप डिस्कमध्ये रुग्णाला जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची आवश्यकता असते.
 • दोन ते तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. वेदना कमी होण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात तसेच मांसपेशींना आराम मिळावा म्हणून स्टेरॉइडसही देतात.
 • बहुतेक रुग्णांना सर्जरीची गरज लागत नाही.या समस्येवर फिजियोथेरपीही प्रभावी ठरते; मात्र ती वेदना कमी झाल्यानंतर केली जाते.

– डॉ. संतोष काळे

Related Stories

सामना विषम ज्वराचा

Amit Kulkarni

पित्तशूल आणि ऍलोपॅथी

Omkar B

लेसर उपचारांचा दिलासा

Omkar B

चहा आणि कोरोना

Omkar B

यात असतात कार्बोदकं… डाएट अँड न्यूट्रिशन

tarunbharat

दांतारोग्य आणि फ्लोराईड

Omkar B
error: Content is protected !!