Tarun Bharat

समाजमाध्यम वापरावरील बंदी हटविण्याचा निर्णय

जम्मू-काश्मीर प्रशासनाने उचलले पाऊल

वृत्तसंस्था/  श्रीनगर

जम्मू-काश्मीर प्रशासनाने समाजमाध्यम वापरावर घालण्यात आलेली बंदी बुधवारी हटविली आहे. केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिक 2जी मोबाईल आणि फिक्स्डलाइन इंटरनेटच्या माध्यमातून सर्व संकेतस्थळांचा वापर करू शकतील असे प्रशासनाने म्हटले आहे.

मुख्य गृह सचिव शालीन काबरा यांनी दूरसंचार सेवा नियमांची संपूर्ण सुरक्षा स्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेवरील प्रभावाच आढावा घेतल्यावर हा आदेश काढला आहे. संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात 17 मार्चपर्यंत केवळ 2जी सेवाच उपलब केली जाणार आहे. तसेच भविष्यातही प्रशासन यासंबंधी निर्णय घेणार आहे. पोस्टपेड सिमकार्ड धारकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तर तर प्रीपेडकार्ड धारकाच्या दस्तऐवजांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत प्रीप्रेड सिमकार्डवर सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर तसेच राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आल्यापासून इंटरनेट सेवेवर बंधने घालण्यात आली होती. पण या बंधनांना वेळोवेळी शिथिल करण्यात आले आहे.

Related Stories

शेअर बाजारासाठी मंगळवार निराशादायीच

Patil_p

दिल्लीतील कोरोना दिवसभरात 20 नवे रूग्ण 36 जणांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

मागील 24 तासात देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

दिल्ली : कोविशिल्डचा साठा संपला; काही लसीकरण केंद्रे आज होणार बंद

Tousif Mujawar

उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ मैदान मारले

Patil_p

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

Patil_p