Tarun Bharat

समाजाच्या अधोगतीला हिंदूचा आत्मविस्मृतीपणा जबाबदार

सुभाष वेलींकर यांचे प्रतिपादन : हिंदू रक्षा महाआघाडी मेळावा संपन्न

प्रतिनिधी /पणजी

 आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणं झाली. तेव्हा आपल्या समाजाने अनन्वीत अत्याच्यार सहन केले. आपली श्रद्धास्थाने या परकीय आक्रमणकर्त्यांनी नेस्तानाभूत केली. पण आज आपण स्वातंत्र होऊन सुध्दा आजच्या काळाची परिस्थिती काही वेगळी नाही, असे सुभाष वेलींकर यांनी सांगितले. वैश्विक स्तरावर हिंदू समूदायाला हेरून व योजना आखून संपविण्याचा कट विविध अरष्ट्रीय संघटना व समुदाय करीत आहेत. आपल्या हिंदू समाजाच्या अधोगतीला आपला आत्मविस्मृतपणा सुद्धा तितकाच जबाबदार आहे. असेही वेलींकर म्हणाले.

हिंदू रक्षा महाआघाडी मेळावा श्री लक्ष्मी रवळनाथ देवस्थान माशेल येथे संपन्न झाला. त्यावेळी सुभाष वेलींकर कार्यक्रमाचा उद्देश मांडत उपस्थितींना संबोधीत करीत होते.  यावेळी व्यासपिठावर हिंदू रक्षा मेळाव्याचे निमंत्रक सुभाष वेलींकर, भारत माता की जय गोवा राज्य कार्यवाहक प्रविण नेसवणकर, जनकल्याण समितीचे सुरेश डिचोलकर उपस्थित होते.

पुढे बोलताना वेलींकर म्हणाले की आपले नेते आपली बाजू व्यवस्थीतपणे कधीच मांडत नाहीत. हिंदूंच्या हितरक्षणासाठी कधीच पुढे सरसावत नाही. आपला दैदिप्यमान इतिहास व राष्ट्रपुरुषांची माहितीसुद्धा आपल्याला शिकविली जात नाही. आजच्या घडीला हिंदूंना सामुदायीक सामाजिक विचार व संघटना करणे शिकविले पाहिजे आपल्या गोव्यातील समस्थ देवस्थानात व विविध बिनसरकारी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन धर्मांतरास विरोध, लव्हजिहाद, नार्कोटिक जिहाद, भू जिहाद आदींना विरोध करणे काळाची गरज आहे. मंदिर सुरक्षा धर्मशिक्षण समर्थन हिंदू संस्कार समर्थन आदी विषयावर चर्चा करणे व त्यासाठी आवश्यक ती योजना व संघटन करणे आवश्यक आहे असेही वेलींकर यांनी सांगितले.

भारत माता की जय संघटनेचे सदस्य रामदास सावईकर, शैलेश नार्वेकर, यांनी उपस्थितांचा परीचय व स्वागत केले. तीन वेळा ओमकार उच्चारणाने  मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी तिसवाडी हिंदू महाआघाडी समितीची निवड करण्यात आली. त्यात निमंत्रक रक्षक गावकर, सहनिमंत्रक मनोहर नाईक, सचिव अशिष शेटय़े युवा प्रमुख प्रेतेश चोडणकर, सदस्य समीर परब, महेश तारी, समीर कामत व समीर फडते यांचा समावेश आहे.

श्री विजयादुर्गा संस्थान साखवाळ या परीसरात अन्य धार्मियाकडून झालेले अतिक्रमण व सरकारचे अहिंदू धोरण याचा तिव्र निषेध यावेळी करण्यात आला.  या देवस्थानाची पूनरस्थापना करण्यासाठी ठराव घेऊन तो एकमताने संमत  करण्यात आल. गुढी पाढव्याचा आगामी कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने व जल्लोशपूर्वक सर्व ठिकाणी साजरा करावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण नाईक यांनी केले तर रामदास सावईकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मेळाव्यास तिसवाडीतील 20 संस्थामधून 52 पदाधिकारी उपस्थित राहिले होते. मेळाव्याची सांगता शांतीमंत्राने झाली.

Related Stories

मनस्वास्थ्य बिघडलेल्या मुलीकडून आंबेली-वेळ्ळी येथे बापाचा खून

Amit Kulkarni

उसगांव येथील नागरिकांची वीज कार्यालयावर धडक

Patil_p

मनपा मंडळाच्या बैठकीत रस्त्यांच्या दुर्दशेवर जोरदार चर्चा

Amit Kulkarni

रस्त्यांची दयनीय अवस्था आणि दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची नावेलीत निदर्शने

Amit Kulkarni

रमेश तवडकर दादरा-नगर हवेली, दमण-दीव एसटी मोर्चाचे प्रभारी

Amit Kulkarni

कोरोनासंबंधी गुरुवारपासून राज्यात सामाजिक सर्वेक्षण

Omkar B