Tarun Bharat

समाज कल्याण कार्यालयाचे 22 रोजी उद्घाटन

प्रतिनिधी / खानापूर

जिल्हा पंचायतीने खानापूरला समाज कल्याण खात्याची कार्यालयीन इमारत बांधण्यासाठी अनुदान मंजूर केले होते. त्यामधून तालुका पंचायत कार्यालयाजवळ समाज कल्याण खात्याची इमारत बांधली आहे. त्याचे उद्घाटन सोमवार दि. 15 रोजी आमदार अंजली निंबाळकर तसेच तालुक्यातील सर्व जि. पं., ता. पं. सदस्यांच्या उपस्थितीत होणार होते. पण आमदार अंजली निंबाळकर यांच्या सूचनेवरुन हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. ऐनवेळी कार्यक्रम स्थगित झाल्याने जि. पं. व ता. पं. सदस्यांनी संताप व्यक्त केला. व कुठल्याही परिस्थितीत आज आम्ही कार्यालयाचे उद्घाटन करणारच असा आग्रह धरला. पण अखेर उपस्थित समाज कल्याण अधिकाऱयांनी 22 फेब्रुवारी रोजी कुणी गैरहजर राहिले तरीही कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम पूर्ण केला जाईल, असे ठोस आश्वासन दिल्याने या निर्धारातून  जि. पं. सदस्य व ता. पं. सदस्यांनी माघार घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार आमदार अंजली निंबाळकर यांचे पती आजारी असल्याने त्या बेंगळूरला गेल्या आहेत. व त्यांनीच सदर कार्यक्रम आता 22 फेब्रुवारी रोजी करण्याची सूचना समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱयांना दिली होती. पण याबद्दल जि. पं., ता. पं. सदस्यांना याची व्यवस्थित कल्पना देण्यात आलेली नाही. यामुळे आमदार नसल्या तरी ता. पं. अध्यक्षा नंदा कोडचवाडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्धार करू. सोमवारी सकाळी 11 वाजता जि. पं. सदस्य सर्वश्री जितेंद्र मादार, सुरेश मॅगेरी, नारायण कार्वेकर, जयराम देसाई तसेच ता. पं. अध्यक्षा नंदा कोडचवाडकर, ता. पं. सदस्य बसवराज सानिकोप त्या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि त्या सर्वांनी आमदार नसल्या तरी फोटोकॉल प्रमाणे ता. पं. अध्यक्षा नंदा कोडचवाडकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊ शकते.

यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करा, असा आग्रह जि. पं. सदस्य जितेंद्र मादार तसेच उपस्थित जि. पं. व ता. पं. सदस्यांनी धरला. यापूर्वी जिल्हा पंचायतीची मिटींग आहे. याची कल्पना देवूनही आमदार अंजली निंबाळकर यांनी बागायत खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. मग त्यांच्या अनुपस्थित आम्ही समाज कल्याण खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन केले तर काय चुकले, असा आग्रह धरला.

आमदार अंजली निंबाळकर यांचा एकतर्फी कारभार

उपस्थित समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱयांना कोणता निर्णय घ्यावा, याचा पेच पडला. अखेरीस त्यांनी 22 फेब्रुवारी रोजी कुणी आले किंवा न आले तरी कार्यालयाचे उद्घाटन करू, अशी हमी दिल्यानंतर उपस्थित जि. पं. सदस्य व ता. पं. सदस्यांनी माघार घेतली. मात्र यावेळी जि. पं. सदस्य जितेंद्र मादार यांनी तालुक्यात सध्या आमदार अंजली निंबाळकर यांचा एकतर्फी कारभार सुरू आहे. ते आम्हाला मान्य नसून या पुढे त्यांचा कारभार आम्ही चालू देणार नाही. असा तीव्र संताप व्यक्त केला.

Related Stories

म.ए.समिती कोविड सेंटरला सहय़ाद्री सोसायटीची मदत

Amit Kulkarni

हारुगेरी पोलिसांकडून चोरटय़ांना अटक

Amit Kulkarni

जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी पूर्ण

Patil_p

आरक्षणासाठी 27 जून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे

Amit Kulkarni

खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा स्थगित

Patil_p

कल्लेहोळ येथे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Omkar B