Tarun Bharat

समाज कार्यकर्ता पुंडलीक रायकर यांचा मडगावात रविवारी सत्कार

Advertisements

दैवज्ञ समाज, मडगाव संस्थेचा  13 रोजी वर्धापन दिन

प्रतिनिधी /मडगाव

मडगावातील दैवज्ञ समाज, या संस्थेचा 7 वा वर्धापनदिन 13 मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून समाज कार्यकर्ते व बाणावली येथील एक प्रतिष्ठीत नागरीक पुंडलीक रायकर यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्यकर्ते सतिश नेतलकर उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय पाहुणे म्हणून अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष दिनकर बायकेरीकर यावेळी हजर राहतील तर दैवज्ञ समाज, मडगावचे अध्यक्ष रामराव लोटलीकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय नौदळाचे माजी अधिकारी जगन्नाथ शिरोडकर, उत्कृष्ट सुवर्ण कारागीर मधुकर लोटलीकर, राज्य सरकारचा समाज कार्यकर्ता पुरस्कार विजेते डॉ. विलास पाऊस्कर, पोलीस खात्यातील निवृत्त पोलीस अधीक्षक नंदकिशोर रायकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

याच वर्धापन दिनाच्यानिमित्ताने सकाळी 11 वाजता मडगावच्या दैवज्ञ भवनात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली असून सायंकाळी 5.30 वाजता उत्तरपूजा होईल. विनीत शिरोडकर या धार्मीक विधीचे यजमान असतील.

Related Stories

साळावळी धरणग्रस्तांना जमिनीचे हक्क मिळणार

Omkar B

दौलतराव हवालदार सेवानिवृत्त

Omkar B

भृगुकुलोत्पन्न भगवान परशुराम

Amit Kulkarni

वाढत्या बेकायदेशीरपणावर तोडगा काढणे आवश्यक

Patil_p

जणू स्वर्गातल्या अप्सरा पृथ्वीवर प्रगटल्या…

Amit Kulkarni

बांबोळीत बॅरिकेटस् घातल्याने वाहतुक कोंडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!