Tarun Bharat

समितीचे नेते वाय. बी. चौगुले यांना नवहिंदतर्फे श्रद्धांजली

Advertisements

विविध मान्यवरांनी विचार व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली

प्रतिनिधी/ येळ्ळूर

नवहिंद क्रीडा केंद्राचे संस्थापक, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष सहकारमहषी, माजी मुख्याध्यापक, समाजसेवक वाय. बी. चौगुले यांच्या निधनाबद्दल शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नवहिंदसह येळ्ळूर व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

 प्रियदर्शीनी नवहिंद महिला सोसायटीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात ही शोकसभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष एस. बी. सायनेकर होते. वाय. बी. चौगुले हे शिक्षणक्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सहकार क्षेत्राचा कायापालट केला. याचबरोबर समाजसेवाही केली. सीमाप्रश्नासारख्या लढय़ामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांचे कार्य हे उल्लेखनिय आहे. ते ज्ञानी व नि÷ावान व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. ते विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ होते, असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वाय. एन. मजुकर यांनी काढले.

यावेळी उपस्थित असलेले राजेंद्र मुतगेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, जिल्हा पंचायत माजी सदस्य अर्जुन गोरल, एल. आय. पाटील, राजू पावले, तानाजी हलगेकर, प्रा. सी. एम. गोरल, दुद्दाप्पा बागेवाडी, पी. ए. पाटील, आनंद पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करून चौगुले यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रारंभी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष एस. बी. सायनेकर यांनी कै. वाय. बी. चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेचे सचिव अनिल हुंदरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सर्वांनी उभे राहून मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सी. व्ही. पाटील, डी. एन. पाटील, पी. एन. कंग्राळकर, वाय. सी. गोरल, प्रदीप मुरकुटे, डी. ए. उघाडे, नारायण कुंडेकर, पी. एच. पाटील, एच. बी. पाटील, राजू उघाडे, डॉ. तानाजी पावले, संभाजी कणबरकर, एस. सी. मजुकर, अशोक चौगुले, वाय. एन. पाटील, सतीश कुगजी, एस. डी. पाटील, एन. ए. पाटील, वाय. पी. देसूरकर, शुभांगी पाटील, हिरा कुंडेकर, व्ही. एस. कदम, वैशाली मजुकर, रेखा पाटील, पूजा कंग्राळकर व ग्रामस्थ उपस्थित होते..

Related Stories

अमृतमहोत्सवानिमित्त अमृतग्राम योजना

Amit Kulkarni

दक्षिण भागातील पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

Omkar B

धर्मवीर बलिदान मासला गुरुवारपासून प्रारंभ

Amit Kulkarni

मंदिरांवर आता सरकारचा अंमल

Amit Kulkarni

संभाजीनगर-वडगाव बस तातडीने सुरू करा

Amit Kulkarni

नूतन न्यायाधीशांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!