Tarun Bharat

समिल वळवईकर यांच्याकडून कुंभारजुवे मतदारसंघात खत वाटप

सां मातियशच्या 85 शेतकऱयांना लाभ

प्रतिनिधी /तिसवाडी

कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते समिल वळवईकर यांनी मतदारसंघातील सातही ग्राम पंचायत क्षेत्रातील शेतकऱयांना मोफत शेती खते वितरीत करण्याची मोहीम सुरु केली असून तिची सुरुवात काल रविवारी दिवाडी बेटावरील सां मातियश ग्रामपंचायत क्षेत्रात करण्यात आली.

सां मातियश परिसरातील 85 शेतकऱयांना वळवईकर यांनी थेट त्यांच्या शेतीकडे जाऊन खते वितरीत करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले की शेतीत काम करणारी माणसे मिळत नसल्याने शेती अवघड बनली आहे. तरीही खूप परिश्रम घेऊन अन्नधान्य पिकवितो. असा हा शेतकरी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आणखी अडचणीत सापडला आहे, त्याला आपण काहीतरी मदत करावी, या भावनेने आपण हे कार्य सुरु केले आहे.

अनेक भागांमध्ये अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे, मात्र दिवाडी बेटावर मोठय़ा प्रमाणात शेती केली जाते हे पाहून आपले मन प्रसन्न होत असते. त्याचबरोबर या ठिकाणी आईवडिलांप्रमाणे त्यांची तरुण मुलेही शेतकाम करीत असल्याचे पाहून आनंद द्विगुणित होतो. अशांच्या मदतीसाठी आपण सदैव प्रयत्न करणार असल्याचेही वळवईकर यावेळी म्हणाले. सां मातियशचे सरपंच मोहन कवळेकर, पंच आशा पै, माजी सरपंच प्रशांत हरवळकर व शेतकरी उपस्थित होते. ज्या शेतकऱयांना मोफत खत मिळाले, त्यांनी यावेळी वळवईकर यांचे आभार व्यक्त केले. मतदारसंघातील सां मातियश ग्रामपंचायती वितरण झाल्यानंतर गोलती-नावेली, ओल्ड गोवा, करमळी, खोर्ली, सांत इस्तेव्ह व कुंभारजुवे पंचायत क्षेत्रातही याच आठवडय़ात खत वाटप करण्यात येणार असल्याचे वळवईकर यांनी सांगितले.

Related Stories

पणजीसह सहा पालिकांसाठी 423 उमेदवार

Patil_p

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 66 व्या वर्षांत प्रवेश

Amit Kulkarni

जावडेकर यांनी मेळावलीकरांना मार्गदर्शन करावे

Patil_p

खलाशांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नांचे राज्यपालांकडून आश्वासन

Omkar B

मजुरांच्या नावे भाजपकडून 13 कोटींचा घोटाळा

Omkar B

केंद्रीय पथकामार्फत वाघांच्या मृत्यूची चौकशी करणार : राणे

Patil_p