Tarun Bharat

‘समुद्र’मध्ये अवतरले शिवा अन् सिद्धी!

Advertisements

हॉटेल समुद्रच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त

प्रतिनिधी /बेळगाव

शिवा (अशोक फळदेसाई) आणि सिद्धी (विदुला चौगुले) चक्क बेळगावला आले आणि कोरोनानंतर प्रथमच मराठी मालिकेतील कलाकार शहरात आल्याने रसिकही आनंदले. ‘जीव झाला येडा पिसा’ या गाजलेल्या मालिकेत शिवा आणि सिद्धी यांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या. मंगळवारी रात्री ते बेळगावमध्ये आले आणि हॉटेल समुद्र येथे त्यांनी वास्तव्य केले.

बुधवारी पहाटे त्यांनी कपिलेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. सध्या हे दोघेही कलाकार शुटींगसाठी बेळगावला आले असून येथून जवळच असलेल्या गावातील एका वाडय़ामध्ये बुधवारी त्यांचे शुटींग झाले. विशेष म्हणजे हे दोघेही हॉटेल समुद्र येथे वास्तव्यास होते आणि हॉटेल समुद्रच्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शिवा आणि सिद्धी ही त्यांची मालिकेतील नावे असली तरी याच नावाने ते मराठी आणि अन्य भाषिक रसिकांतही लोकप्रिय आहेत. या दोघांनी हॉटेल समुद्रमध्ये आणि समुद्रच्या प्रवेशद्वारापाशी थांबून फोटोही काढून घेतले.

Related Stories

गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाममधून जुन्या गीतांचा सुंदर मिलाफ

Amit Kulkarni

आंबेवाडी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Amit Kulkarni

ध. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

Amit Kulkarni

शहर-तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

हुतात्मा प्रशांत जाधव यांचे पार्थिव आज सकाळी बेळगावात

Nilkanth Sonar

योजना पूर्ण केल्यास तुम्हाला आशीर्वाद मिळेल!

Amit Kulkarni
error: Content is protected !!