Tarun Bharat

समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याची जीवनगाथा

Advertisements

भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची ख्याती क्रीटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जनार्दन जाधव यांच्या ‘कान्होजी आंग्रे‘ या लवकरच प्रकाशित होणार्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन डॉक्टर सुधीर निकम यांनी केले असून चित्रपटाचे पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले आहेत.

अख्ख्या युरोपच्या नौसेनेला ज्यांची धास्ती होती. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज एकत्र येऊन पण ज्यांचा पराभव करू शकले नाहीत असे दर्या सारंग म्हणजेच कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे या चित्रपटाच्या निमित्ताने समुद्राच्या लाटा आणि समुद्रातील राजकारण अचूक हेरून सुरत ते दक्षिण कोकणचा किनारा एकटय़ाने सुरक्षित ठेवणार्या या वीर समुद्रातील गनिमी काव्याचे जनक अशी ओळख असलेल्या प्रथम नौदल सैनिकाची कामगिरी प्रेक्षकांच्या नजरेस येणार आहे. कान्होजी आंग्रे यांची शौर्य गाथा ही प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचावी या उद्देशाने 2022 मध्ये या चित्रपटाची टीम हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

Related Stories

मिथुन चक्रवर्तीच्या मुलासह पत्नीवर गुन्हा दाखल

Tousif Mujawar

दिशाचे नाक झाले सरळ

Patil_p

पांडू म्हणतोय ‘सूचनांचं पालन करायला इसरु नका’

Archana Banage

अनन्या पांडेच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Amit Kulkarni

श्रेया बुगडे झळकणार वेबसीरीजमध्ये

Patil_p

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर कोरोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप; चौकशीचे आदेश

Tousif Mujawar
error: Content is protected !!