Tarun Bharat

सरकारकडून सत्तरीतील शेतकऱयांची थट्टा

दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासहित रस्त्यावर उतरणार : शेतकऱयांचा इशारा

प्रतिनिधी /वाळपई

सत्तरी तालुक्मयात जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. सरकारने ही नुकसानभरपाई गणेश चतुर्थीच्या पूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याआश्वासनाची अजून पर्यंत पूर्तता झालेली नाही. ही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा सत्तरी तालुक्मयातील शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेत प्रगतशील शेतकरी रणजीत राणे, दत्ताराम मोरे, रोहिणी गावकर ऐश्वर्या मोरे, गणेश पर्येकर यांची उपस्थिती होती.

महापुरात झालेल्या नुकसानीचे कृषी खात्याने सर्वेक्षण करून सरकारला अहवाल सादर केलेला आहे. कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकरी बांधवांना गणेश चतुर्थीच्या पूर्वी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पूर्तता झालेली नाही. यावरून सरकार शेतकरी बांधवाची खरोखरच थट्टा करत आहे का? असा सवाल रणजीत राणे यांनी व्यक्त केला. दिवाळीपूर्वी ही नुकसान भरपाई न मिळाल्यास सत्तरातील शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

शेतकऱयांना वाली कोण? दत्ताराम मोरे

  सध्यातरी शेतकरी बांधवांना कोणीही वाली उरलेला नाही. सरकारने पूरग्रस्तांना शेतकरी आधार निधीच्या माध्यमातून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. ही नुकसान भरपाई पूर्णपणे तुटपुंजी राहणार असून सरकारने खास व्यवस्था करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी ज्ये÷ शेतकरी दत्ताराम मोरे यांनी केली आहे.

 साफसफाईसाठी पैशांची गरज -रोहीणी गावकर

पुरामुळे मोठय़ा प्रमाणात शेती बागायतीमध्ये कचरा भरलेला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. सरकारने अजून पर्यंत एकही रुपया खात्यावर जमा केलेला नाही. यामुळे बागायतीमधील कचरा कसा साफ करावा? असा सवाल महिला शेतकरी रोहिणी गावकर यांनी व्यक्त केला.

गेल्यावषीची नुकसानभरपाई अद्याप नाही -श्वेता मोरे

 गेल्या वषीची नुकसान भरपाई अजूनही मिळालेले नाही .यामुळे  आपल्याला मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्यातरी महागाई वाढत असून यामुळे शेतीमध्ये काम करण्यासाठी कामगार वापरण sपरवडाणार नाही, असे महिला शेतकरी श्वेता मोरे यांनी सांगितले. शेतकरी गणेश पर्येकर यांनी यावेळी बोलताना सरकारने शेतकरी बांधवांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत  व्यक्त केले.

Related Stories

गोपाळकृष्ण गजानन मंदिरचा उद्यापासून सुवर्ण महोत्सव

Patil_p

राज्यात जोरदार पाऊस

Patil_p

मयेतील युवानेते प्रेमेंद्र शेट आज करणार मगो पक्षात प्रवेश

Amit Kulkarni

बोकडबाग डोंगर बळकावू देणार नाही, गावकऱयांचा निर्धार

Omkar B

आता वर्षभर घेता येणार मानकुरादचा आस्वाद

Amit Kulkarni

रानडुकराच्या हल्ल्यात एकटा ठार

Omkar B