Tarun Bharat

सरकारचा मोठा निर्णय : चीनला परत करणार खराब अँटीबॉडी टेस्ट किट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात आलेल्या खराब अँटीबॉडी टेस्ट किटबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता आपल्या देशात खराब आलेल्या खराब अँटीबॉडी टेस्ट किट परत चीनला पाठवण्यात येणार आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

आरोग्य मंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ज्यामध्ये सांगण्यात आले की, सर्व खराब चाचणी किट परत देण्यात येतील. या किट बाबत अनेक राज्यांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांशी बोलताना त्यांनी सांगितले, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही मदत करण्यास आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवू. ते आपल्याला पूर्णपणे मदत करतील. जेणे करून आम्हाला त्याचा फीडबॅक देखील मिळेल. 

दरम्यान, चीनच्या वांडोफ बायोटे व लिवजोन डायग्नोस्टिक ने आत्तापर्यंत जवळपास 40 कोटींची 8.5 लाख किट भारताला पाठवली आहेत. 

Related Stories

कोरोनाच्या लढाईत काँग्रेसकडून राजकारण

Patil_p

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

Tousif Mujawar

“रशियावर निर्बंध म्हणजे युद्धाची घोषणा…”

Abhijeet Khandekar

पंजाब मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ५३ लाख कुटुंबांचं वीज बिल माफ

Archana Banage

गुजरातमधील राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar